आळेफाटा उपबाजारात कांदा दरात घसरण : शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी (दि. 10) झालेल्या लिलावात कांदादरात घसरण झाली. लिलावात प्रतिदहा किलो कांद्याला 201 रुपये दर मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे व संचालक नबाजी घाडगे यांनी दिली. केंद्र सरकारने शनिवारी (दि. 4) कांदा निर्यात काही अटींवर खुली केली. पावणेपाच महिन्यांनंतर कांदा निर्यात खुली केल्यावर …

आळेफाटा उपबाजारात कांदा दरात घसरण : शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच

आळेफाटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी (दि. 10) झालेल्या लिलावात कांदादरात घसरण झाली. लिलावात प्रतिदहा किलो कांद्याला 201 रुपये दर मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे व संचालक नबाजी घाडगे यांनी दिली. केंद्र सरकारने शनिवारी (दि. 4) कांदा निर्यात काही अटींवर खुली केली. पावणेपाच महिन्यांनंतर कांदा निर्यात खुली केल्यावर दरात वाढ झाली. यामुळे मंगळवारी आळेफाटा उपबाजारात कांद्याची उच्चांकी आवक झाली. परिणामी, पुन्हा दरात घसरण झाली व शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली.
दोनशे रुपयांवर मिळालेले कमाल दर पुन्हा दोनशे रुपयांवर आले. दरम्यान, आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी कांद्याची चांगली आवक झाली. दरातील या घसरणीमुळे आळेफाटा उपबाजारात कांदा विक्रीस आलेले शेतकरी चांगलेच हवालदिल झाले. दरम्यान, दर असेच राहिल्यास येथील कांदा आवकही घटणार आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात शेतकर्‍यांनी 28 हजार 900 कांदा गोणी विक्रीस आणल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महाम्बरे यांनी दिली.
कांद्याला प्रतिदहा किलोस मिळालेले दर

 एक्सट्रा गोळा : 180 ते 201 रुपये
 सुपर गोळा : 160 ते 180 रुपये
 सुपर मीडियम : 140 ते 160 रुपये
 गोल्टी व गोल्टा : 100 ते 135 रुपये
 बदला व चिंगळी: 30 ते 110 रूपये
 एक्सट्रा गोळा : 180 ते 201 रुपये
 सुपर गोळा : 160 ते 180 रुपये
 सुपर मीडियम : 140 ते 160 रुपये
गोल्टी व गोल्टा : 100 ते 135 रुपये
बदला व चिंगळी: 30 ते 110 रूपये

हेही वाचा

बंधारे भरण्यासाठी भामा आसखेडमधून सोडले पाणी.
जागतिक मातृ दिन |’सिंगल मदर’ पेलतेय मुलांसह कुटुंबाचे अवकाश!
स्वाती मालीवालांना दिल्‍ली मुख्यमंत्र्यांच्या सहकार्‍याकडून मारहाण : दिल्ली पोलीस