छत्रपती संभाजीनगर : खुलताबादेत मतदान मशीन 3 तास बंद

छत्रपती संभाजीनगर : खुलताबादेत मतदान मशीन 3 तास बंद

खुलताबाद; Bharat Live News Media वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी खुलताबाद शहरातील पंचायत समिती येथील बुध क्र ५६ वर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. १० वाजण्याच्या सुमारास एका मतदाराने जास्त वेळ बटन दाबून ठेवल्याने मशीन काही काळ बंद पडले. त्यावेळी मतदान केंद्रावर २०३ मतदान झाले होते. परत ११ वाजण्याच्या सुमारास मशीन क्र १ बंद पडले. त्यावेळी जवळपास २८७ मतदारांनी मतदान केले होते.
मतदान मशीन क्र १ बंद पडल्याने प्रशासनाकडून मशीन बदल करून दुसरे मशीन लावण्याचे कामा सुरू केले. मात्र सकाळी ९ वाजल्‍यापासून मतदानासाठी उभे असलेले मतदार १२ वाजेपर्यंत जवळपास ३ तास ताटकळत उभे होते. मतदाना साठी गर्दी वाढत होती. यामुळे नवतरुण वर्ग निघून जात होता. मतदानासाठी उभ्या असलेल्या वयोवृद्ध महिलांना यामुळे ताटकळत रहावे लागले. प्रशासनाच्या वतीने त्यांना बसण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात येत नव्हती. प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर दुसरे मशीन टेस्ट करून सुरू करण्यात आले.
हेही वाचा : 

Narendra Modi : रोटी लाटली, भाविकांना जेवणही वाढले, पटना साहिब गुरुद्वारात पीएम मोदींची सेवा; पाहा Photos

गोमांस कंपनीकडून मोदींना ५५० कोटी : संजय राऊत यांचा आरोप

अल्लू अर्जुन, ज्यु. एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क, चिरंजीवी पत्नीसोबत पोहोचले (Video)