लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात सकाळी ९ पर्यंत १०.३५ टक्के मतदान
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजता पासून सुरू झाले आहे. देशभरात ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान देशात १० मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.३५ टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Election 2024)
देशात सार्वत्रिक निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
सकाळी ९ वाजेपर्यंत १०.३५ टक्के मतदान.
९ वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये १५. २४ टक्के तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्र – ६. ४५ टक्के.
१० राज्यांच्या ९६ जागांसाठी मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशात आज (दि.१०) १० राज्यांच्या ९६ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११, आंध्र प्रदेशातील २५, बिहारमध्ये ५,झारखंडमध्ये ४, मध्य प्रदेशात ८, ओडिशात ४, तेलंगणात १७, उत्तर प्रदेशात १३, पश्चिम बंगालच्या ८ आणि जम्मू-काश्मीरच्या एका जागेचा त्यात समावेश आहे. दरम्यान सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. (Lok Sabha Election 2024)
मतदानाची राज्यानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे
आंध्रप्रदेश – ९.०५ टक्के
बिहार – १०.१८ टक्के
जम्मू-काश्मीर – ५.०७ टक्के
झारखंड – ११.७८ टक्के
मध्य प्रदेश – १४.८७ टक्के
महाराष्ट्र- ६. ४५ टक्के
ओडिशा – ९. २३ टक्के
तेलंगणा – ९. ५१ टक्के
उत्तर प्रदेश – ११.६७ टक्के
पश्चिम बंगाल – १५. २४ टक्के
वरील राज्यातील सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता सर्वात जास्त मतदान हे पश्चिम बंगाल १५. २४ टक्के झाले आहे. तर सर्वात कमी मतदान जम्मू-काश्मीर – ५.०७ टक्के झाले आहे.
कधी लागणार निकाल?
देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. लोकसभा निवडणुक २०२४ याचा निकाल येत्या चार जूनला लागणार आहे.
#LokSabhaElections2024 | 10.35% voter turnout recorded till 9 am, in the fourth phase of elections.
Andhra Pradesh 9.05%
Bihar 10.18%
Jammu And Kashmir 5.07%
Jharkhand 11.78%
Madhya Pradesh 14.97%
Maharashtra 6.45%
Odisha 9.23%
Telangana 9.51%
Uttar Pradesh 11.67%
West Bengal… pic.twitter.com/tmtjV4Aluw
— ANI (@ANI) May 13, 2024
हेही वाचा
धुळे-नंदुरबार लोकसभेसाठी शिरपूर आणि साक्री मधून मतदानास सुरुवात
तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?: स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल
जळगाव : मतदारांनी केले सकाळच्या सत्रातच मतदान करणे पसंत
रावेर लोकसभा 2024 : सकाळच्या सत्रात दोन तासात रावेर 7.14 टक्के तर जळगाव 6.14 टक्के