नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मांजराचे दर्शन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पेंच व्याघ्र प्रकल्पात नरहर गावाजवळ कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट्या मांजर आढळून आले. विशेष म्हणजे मध्य भारतामध्ये बिबट्या मांजर दिसण्याची ही पाहिलीच घटना आहे. नरहर जवळील एका पाणवठ्यावर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला होता, त्यामध्ये याचे छायाचित्र संकलित झालेले आहे. भारतात मांजर कुळातील एकूण १५ प्रजाती आढळतात. त्या प्रजातींपैकी १० लहान प्रजाती आहेत. या …

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मांजराचे दर्शन

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पेंच व्याघ्र प्रकल्पात नरहर गावाजवळ कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट्या मांजर आढळून आले. विशेष म्हणजे मध्य भारतामध्ये बिबट्या मांजर दिसण्याची ही पाहिलीच घटना आहे. नरहर जवळील एका पाणवठ्यावर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला होता, त्यामध्ये याचे छायाचित्र संकलित झालेले आहे.
भारतात मांजर कुळातील एकूण १५ प्रजाती आढळतात. त्या प्रजातींपैकी १० लहान प्रजाती आहेत. या लहान प्रजातींना मुख्यत: उंदरांच्या शिकारीमुळे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिका बजावतात. सद्यःस्थितीत ही प्रजाती दुर्मिळ होत चालली आहे. बिबट्या मांजर (Prionailurus bengalensis) जी भारतातील रान मांजरीनंतर सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे. ती ईशान्य भारत, उत्तर हिमालयीन राज्ये, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि पश्चिम घाटाच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात सापडते.
परंतु मध्य भारतात बिबट्या मांजरांचे अस्तित्व नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंग देव वन्यजीव अभयारण्याचा बफर वनपरिक्षेत्र आहे. ‘नागलवाडी’च्या नरहर बीटमधील कक्ष क्रमांक. ६६३ मध्ये हे बिबट्या मांजर आढळली आहे. भारतीय भुभागामधील सर्वात प्राचीन संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे.
प्राणी संवर्धनासाठी सविस्तर अभ्यास केला जाणार
संवर्धनाचे प्रयत्न यशस्वीरित्या करण्यासाठी प्रत्येक प्राण्याचा सविस्तर अभ्यास असणे अत्यंत आवश्यक आहे. लेपर्ड कॅटच्या अस्तित्वामुळे आतापर्यंत तुलनेने कमी-अभ्यास केलेल्या मांजर कुळातील बिबट्या मांजराच्या सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय प्राण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जाणार आहेत. पेंच प्रकल्पात बिबट्या मांजर आढळल्याने त्याचा मागोवा घेऊन सवंर्धनावर अधिक भर देण्यात येणार आहे.
हेही वाचा :

बोकनूरमध्ये तीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यु
मोदी, शहा यांच्याकडे ईडी-सीबीआयच्या चाव्या : मल्लिकार्जुन खर्गे
दिल्लीत शाळांनतर रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी