RCB vs DC : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय

 RCB vs DC : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 चा ६२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.  सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉयल चॅलेंजर्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ अशा पद्धतीचा असणार आहे. जर हा संघ हरला तर त्यांचा प्रवास इथेच संपेल. मात्र, दिल्ली हरली तर आणखी एक सामना बाकी आहे. मात्र, हा प्रवास त्याच्यासाठी खूप कठीण होणार आहे. या स्थितीत त्याला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
संघ :
दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (क), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
इम्पॅक्ट सब: डेव्हिड वॉर्नर, सुमित कुमार, रिकी भुई, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.
इम्पॅक्ट सब: स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशाक, हिमांशू शर्मा
 

🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals win the toss and elect to bowl against @RCBTweets
Follow the Match ▶️ https://t.co/AFDOfgLefa#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/Ljx8CVGrkv
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024