‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीची दिलखेचक अदा अन् चाहते घायाळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत लहान मुलीची भूमिका साकारणाऱ्या मुन्नीला कोण ओळखत नाही. या चित्रपटात सलमानसोबत मुन्नीचे मुख्य भूमिका खूपच गाजली. मुन्नी म्हणजे, अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा होय. चित्रपटात लहान दिसणारी हर्षाली आता मोठी झाली असून दिवसेंदिवस खूपच ग्लॅमरस दिसत आहे. आता हर्षालीचा ‘हिरामंडी’ चिपटातील एका गाण्यावर जबरदस्त मूव्ह स्टेप …
‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीची दिलखेचक अदा अन् चाहते घायाळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत लहान मुलीची भूमिका साकारणाऱ्या मुन्नीला कोण ओळखत नाही. या चित्रपटात सलमानसोबत मुन्नीचे मुख्य भूमिका खूपच गाजली. मुन्नी म्हणजे, अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा होय. चित्रपटात लहान दिसणारी हर्षाली आता मोठी झाली असून दिवसेंदिवस खूपच ग्लॅमरस दिसत आहे. आता हर्षालीचा ‘हिरामंडी’ चिपटातील एका गाण्यावर जबरदस्त मूव्ह स्टेप पाहायला मिळाल्या. तिच्या एक्सप्रेशन्स पाहून चाहत्यांना तिने आश्चर्यचकित केलं आहे.
हर्षालीच्या ‘या’ गाण्याचे बोल
अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा हिने नुकतेच तिच्या इन्टाग्रामवर ‘हिरामंडी’ चिपटातील एका गाण्यावर एक्सप्रेशन्स देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्याचे बोल ”एक बार देख लिजिये, दिवाना, बना दिजीये… जलने को है तयार हम….” असे आहेत. गाण्याच्या सुरूवातील हर्षालीच्या हातात एक पुस्तक दिसतेय आणि यानंतर तिच्या हातात धुपआरती दिसते.
यावेळी हर्षालीने सोनेरी कलरच्या चकाकणाऱ्या लेंहगा-चोळीवर ओढणी परिधान केली आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, दोन्ही हातात मोठ्या दोन अंगठ्या, कानात मोठे झुमके, नाकात नथ, रेड निलपेंड, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. या व्हिडिओला तिने ”Ek Baar Dekh Lijiye😌👑…” अशी कॅप्शन लिहिली आहे.
कॉमेन्टचा पाऊस…
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. दरम्यान एका यूजर्सने लिहिले की, ‘तू खूप सुंदर दिसत आहेस’, दुसऱ्या एकाने ‘मुन्नी डान्सही करू शकते का?.’ असे लिहिले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या मुव्ह स्टेपचे भरभरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यत १ लाख ५२ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
मूकबधिर पाकिस्तानी मुलीची भूमिका
हर्षालीने २०१५ मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यावेळी ती फक्त ८ वर्षांची होती. या चित्रपटात हर्षालीने एका मूकबधिर पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली आहे. जी चुकून तिच्या आईपासून विभक्त होवून भारतात येते. यानंतर सलमान खान तिला तिच्या आईकडे पोहोचवतो असे दाखविले आहे. सलमानसोब चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने भूमिका साकारली आहे.
हेही वाचा 

Allu Arjun : पुष्पा २ फेम अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण: दोघांना न्यायालयीन कोठडी
Salman Khan residence firing case: सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण| पाचव्या संशयित आरोपीला राजस्थानमधून अटक

 

View this post on Instagram

 
A post shared by Harshaali Malhotra (@harshaalimalhotra_03)