गोवा : सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे एकाचा गुदमरून मृत्यू

गोवा : सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे एकाचा गुदमरून मृत्यू

वास्को; दीपक जाधव : फकीर गल्ली-साईनगर येथे घरगुती सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने एकाचा गुदमरून मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
संजय, धरमवीर, अशोक व अमन अशी त्यांची नावे असून ते मूळ बनारस येथील आहेत. या घटनेत संजयचा मृत्यू झाला असून धरमवीर, अशोक व अमन यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जेवण करून चौघेही झोपी गेले होते. सकाळी शेजारील तरूणाने दरवाजा ठोठावत त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने दरवाजा फोडण्यात आला. यावेळी चौघेही बेशुद्ध असल्याचे आढळून आले. हे सर्वजण दोन महिन्यांपूर्वी गोव्यात कामानिमित्त आले होते.
हेही वाचा : 

वडिलांच्या निधनानंतर १२ वर्षांनी उघडले लॉकर, मिळाले तीन कोटी; सर्व नोटा कालबाह्य
Goa News : काणकोणात समुद्रकिनारी बारमाही पर्यटक