वळवाच्या पावसामुळे भुसावळ बसस्थानकाला तलावाचे स्वरुप

वळवाच्या पावसामुळे भुसावळ बसस्थानकाला तलावाचे स्वरुप

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन-तीन दिवसांमध्ये वादळीवाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वळवाच्या पावसामुळे भुसावळ शहरात जोरदार पाऊस झाल्याने भुसावळ बस स्थानकास तलावाचे रुप प्राप्त झाले. प्रवाशांना बसस्थानकात पाणी जमा झाल्याने चिखल तुडवत मार्ग काढत बसमध्ये प्रवेश करावा लागत होता. याच बस स्थानकाच्या पोर्टसाठी आमदारांनी उपमुख्यमंत्री यांना गळ घातली होती.
राज्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे तापमान उच्चांकावर असते. यावेळी एप्रिल महिन्यातच तापमान 45 अंशावर गेले होते. तर मे महिना हा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाचा असतो. मात्र शनिवार (दि.११) रोजी रात्रीच्या सुमारास वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार विजेच्या कडकडासह जोरदार पावसाचे आगमन झाले. जवळपास अर्धा ते पाऊण पावासाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.
रात्री आलेल्या पावसामुळे शहरातील व तसेच तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या बस स्थानकाला मात्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील बसस्थानकाना प्रत्येक पावसाळ्यात असेच स्वरुप प्राप्त होत असते. या बसस्थानकाबाबत विधानसभेमध्ये देखील प्रश्न मांडण्यात आला होता. बस स्थानकातील परिसरामध्ये डांबरीकरण करण्यासाठी निधी देखील मंजुर करण्यात आला होता. तर नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रावेर लोकसभेच्या प्रचारासाठी भुसावळ येथे आले असता मुख्यमंत्री यांच्यासमोर बस स्थानकाचा विषय मांडण्यात आल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीसाठी मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा:

Harshaali Malhotra : एक बार देख लिजियें…; ‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीची दिलखेचक अदा अन् चाहते घायाळ
Afghanistan floods : अफगाणिस्तानमधील पूर बळींची संख्‍या ३१५ वर
Virat Kohli मैदानात उतरताच रचणार इतिहास! ‘या’ बाबतीत बनणार जगातील पहिला क्रिकेटर