निसर्ग कोपला..! अफगाणिस्तानमधील पूर बळींची संख्‍या ३१५ वर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अतिवृष्‍टीमुळे आलेल्‍या महापूराचा मोठा फटका उत्तर अफगाणिस्‍तानला बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमधील मृतांची संख्‍या ३१५वर पोहली असून १,६०० हून अधिक नागरिक जखमी झाल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने तालिबान संचलित निर्वासित मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने दिले आहे. उत्तर अफगाणिस्‍तानवर आस्मानी संकट उत्तर अफगाणिस्‍तानातील उत्तर बागलान प्रांताला १० मे रोजी अतिृष्‍टीचा तडाखा बसला पहिल्‍याच दिवशी १५३ हून …

निसर्ग कोपला..! अफगाणिस्तानमधील पूर बळींची संख्‍या ३१५ वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : अतिवृष्‍टीमुळे आलेल्‍या महापूराचा मोठा फटका उत्तर अफगाणिस्‍तानला बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमधील मृतांची संख्‍या ३१५वर पोहली असून १,६०० हून अधिक नागरिक जखमी झाल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने तालिबान संचलित निर्वासित मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने दिले आहे.
उत्तर अफगाणिस्‍तानवर आस्मानी संकट

उत्तर अफगाणिस्‍तानातील उत्तर बागलान प्रांताला १० मे रोजी अतिृष्‍टीचा तडाखा बसला
पहिल्‍याच दिवशी १५३ हून अधिक नागरिक मृत्‍युमुखी पडले.
महापुरामुळे हजारो घरांचे मोठे नुकसान

Taliban ministry: death toll from floods in northern Afghanistan rises to 315 https://t.co/p0qdAVUMaY pic.twitter.com/Xl6Ci2v6mZ
— Reuters (@Reuters) May 12, 2024

उत्तर अफगाणिस्‍तानला शुक्रवार, १० मे रोजी मुसळधार पावसाने झोडपले. महापुरामध्‍ये पहिल्‍याच दिवशी १५३ हून अधिक नागरिक मृत्‍युमुखी पडले होते. आज तालिबान संचलित निर्वासित मंत्रालयाच्‍या हवाल्‍याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्टमध्ये उत्तर बागलान प्रांतातील प्रांतीय कार्यालयातील आकडेवारी जाहीर केली. अतिवृष्‍टीनंतर आलेल्‍या महापुरामुळे हजारो घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांबरोबर जनावरांनाही याचा फटका बसला आहे. पुरामुळे आरोग्य सेवा सुविधाही पूर्णपणे कोलमडली आहे.
हवामान बदलासाठी अफगाणिस्‍तान सर्वात असुरक्षित देशांपैकी एक
मागील काही वर्ष हवामान बदलासाठी सर्वात असुरक्षित देशांपैकी एक अफगाणिस्‍तान असल्‍याचे संयुक्‍त राष्‍ट्रांनी जाहीर केले आहे. तालिबानचे अर्थव्यवस्था मंत्री दिन मोहम्मद हनिफ यांनी आज (दि.१२) एका निवेदनाच्‍या माध्‍यमातून संयुक्‍त राष्‍ट्र, जगभरातील मानवतावादी संस्थांनी पूरग्रस्‍तांना मदत करावी, असे आवाहन केले आहे.
बागलान प्रांताबरोबरच ईशान्य, मध्य घोर आणि पश्चिम हेरातमधील बदख्शान प्रांताला देखील महापुराचा फटका बसला आहे. या भागातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बागलान प्रांतामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
हवाई दलाचे मदतकार्य सुरु
हवाई दलाच्‍या मदतीने पूरग्रस्‍तांना बाहेर काढण्यास येत आहे. 100 हून अधिक जखमी लोकांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. पूरग्रस्‍त नागरिकांना औषध आणि प्रथमोपचार वितरित करण्यास सुरुवात केली आहे,” असेही तालिबान सरकारने आपल्‍या निवेदनात नमुद केले आहे. बागलानच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख हेदायतुल्ला हमदर्द यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, पूरग्रस्‍तांच्‍या बळींचा आकडा वाढू शकतो.
हेही वाचा :

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार; वीज पडून ५७ जणांचा मृत्यू
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान हादरले; ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
Earthquake in Afghanistan : अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार; मृतांचा आकडा २ हजारांवर