नाशिकमध्ये वळवाच्या पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी बत्तीगुल

नाशिकमध्ये वळवाच्या पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी बत्तीगुल

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
शहर परिसराम‌ध्ये शनिवारी (दि. ११) सायंकाळी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरवासीयांची धावपळ उडाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शहरात सायंकाळी वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता.
राज्याच्या विविध भागांत दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या वाळवाच्या पावसाने शुक्रवारी देखील नाशिकमध्ये हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी सातनंतर शहर परिसरात अचानक जोरदार वारे सुटले. तसेच आकाशात काळे ढगदेखील दाटून आले. पंचवटी, सिडको, सातपूर आदी भागात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी बत्तीगूल झाली. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. या वळवाच्या पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची भीती आहे. कांदा, भाजीपाला, टोमॅटोसह अन्य पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:

नाशिक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सीआरपीएफ दाखल
जळगाव : कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मशीन मतदान केंद्रांवर रवाना 
IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, मुंबई इंडियन्सच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले