मायस्थेनिया : एक धोकादायक आजार

मायस्थेनिया : एक धोकादायक आजार

– डॉ. संजय गायकवाड

मायस्थेनिया हा एक धोकादायक विकार आहे. सुरुवातीला या रोगाची लक्षणे अगदी सर्वसाधारण असतात. जसे पायर्‍या चढताना थकवा जाणवणे, चालताना दम लागणे, डोळ्यांची सूज इत्यादी. अनेकदा लहान-मोठ्या शारीरिक मेहनतीच्या कामानंतर आपल्याला खूप थकल्यासारखे वाटते. मायस्थेनिया विकाराचा प्रभाव चेहरा आणि मान यांच्यावर जास्त दिसून येतो. बहुतांश वेळा हा रोग आनुवांशिक आहे. पण, अनेकदा एखाद्या संसर्गामुळे किंवा दीर्घकाळ शारीरिक मेहनत केल्यामुळेही हा आजार जडतो.
मायस्थेनिया का होतो?
याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. रक्तात अ‍ॅसिटाईलकोलीन रेसेप्टर नावाच्या रासायनिक घटकाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. हा रासायनिक घटक शरीराच्या स्नायूंना अ‍ॅक्टिव्ह आणि ऊर्जेने परिपूर्ण राखतो. या घटकाच्या कमतरतेमुळे स्नायू सुस्त आणि ढिले पडतात. त्यामुळे थोडे जरी चालले किंवा लहानसहान कामे केली तरीही खूप जास्त थकवा येते.
मायस्थेनियाचा धोका
हा आजार प्राणघातकही ठरू शकतो. सुरुवातीलाच याची लक्षणे ओळखली नाहीत आणि योग्य वेळी यावर उपचार झाले नाही, तर जेवण करण्यास आणि श्वसनासही त्रास होतो. त्यामुळे काही वेळा रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे मायस्थेनिया रोगाच्या सुरुवातीच्या काळातच उपचारांची शक्यता पडताळून पाहायला हव्यात.
कारणे
या रोगाचे प्रमुख कारण म्हणजे छातीच्या आतील एक विशेष ग्रंथी. थाइमस ग्रंथी छातीच्या आत, पण हृदयाच्या बाहेरच्या बाजूला असते. या थायमस ग्लॅडमध्ये ट्यूमर असतो त्यामुळे तिचा आकार वाढतो. मायस्थेनिया रोगामध्ये 90 टक्के रुग्णांमध्ये ही थाइमस ग्रंथीच जबाबदार असते बाकी 10 टक्के प्रकरणात ऑटो इम्यून रोगच जबाबदार असतात.
लक्षणे
प्रारंभिक अवस्थेत मायस्थेनियामध्ये अगदी केस विंचरण्यातही अडचण येते. खूप हलके सामान उचलले तरीही व्यक्तीला थकवा येतो. अगदी 2-3 पायर्‍या चढल्या किंवा सामान्य वेगाने चालण्यासही त्रास होतो. विकाराची तीव्रता वाढल्यास डोळ्याच्या पापण्या वरच्या बाजूला उघडण्यास त्रास होतो. दोन्ही डोळे फार वेळ उघडे ठेवणेही कठीण असते. डोळे पूर्ण बंद करणे शक्य होत नाही. तसेच डोळे एका ठिकाणी केंद्रित करता येत नाहीत. चेहरा अगदीच भावरहित शून्यात हरवल्यासारखा दिसतो. ओठ बाहेरच्या बाजूला निघतात.
हेही वाचा

Genetic Disorders : आनुवंशिक आजार
कंपवात आजाराची लक्षणे आणि उपचार
अनेक आजारांना दूर ठेवतात अक्रोड