ममतांना धक्‍का, मतदानापूर्वी ‘तृणमूल’ उमेदवाराची पत्‍नी भाजपमध्‍ये दाखल

ममतांना धक्‍का, मतदानापूर्वी ‘तृणमूल’ उमेदवाराची पत्‍नी भाजपमध्‍ये दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमध्‍ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. भाजप आणि तृणमूलमधील राजकीय संघर्षाची चर्चा राष्‍ट्रीय पातळीवर होत आहे. आता मतदानाला काही तासांचा अवधी शिल्‍लक असतानाच नादिया जिल्ह्यातील राणाघाट लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार मुकुटमणी अधिकारी यांच्‍या पत्नी स्वस्तिका भुवनेश्वरी उर्फ ​​रोझी यांनी आज (दि.११) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राणाघाटमध्‍ये सोमवार, १३ मे रोजी मतदान होणार आहे.
मिथुन चक्रवर्तींच्‍या उपस्‍थितीत स्वस्तिका भुवनेश्वरी भाजपमध्‍ये दाखल
आज सायंकाळी चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपण्याच्या काही तास शिल्‍लक असतानाच राणाघाटातील ताहेरपूर येथे जाहीर सभा झाली. यावेळी रोझी यांनी भाजप नेते आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्‍या उपस्‍थितीत भाजपमध्‍ये प्रवेश केला. चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिथुन भाजपचे उमेदवार जगन्नाथ सरकार यांच्या समर्थनार्थ राणाघाट येथून निवडणूक रॅलीसाठी गेले होते. राणाघाट येथे १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजप आमदार मुकुटमणींनी भाजप सोडून तृणमूलमध्ये केला हाेता प्रवेश
मिथुनने पक्षात त्यांचे स्वागत करताना सांगितले की, रोझी अजूनही कायदेशीररित्या तृणमूलचे उमेदवार मुकुटमणी अधिकारी यांची पत्नी आहे. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मुकुट मणी यांनीही भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. पश्‍चिम बंगालमध्‍ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राणाघाट दक्षिण (राखीव) जागेवरून मुकुट मणी आमदार म्हणून निवडून आले होते. तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला.
हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांचा ४ जूननंतर सरकार बनविण्याचा दावा
Satara Lok Sabha Election : मोदी सरकारविरोधात आसूड उगारा : शरद पवार
bihar lok sabha election 2024 नितीशनी केली लालूंची कोंडी

Latest Marathi News ममतांना धक्‍का, मतदानापूर्वी ‘तृणमूल’ उमेदवाराची पत्‍नी भाजपमध्‍ये दाखल Brought to You By : Bharat Live News Media.