गोंदियात युवकाजवळ सापडली विदेशी पिस्तुल

गोंदियात युवकाजवळ सापडली विदेशी पिस्तुल

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गोंदिया शहरातील श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड येथील एका युवकाला आज (दि. १०) विदेशी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मॅगझिनसह ५ जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर,(वय २८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Gondia News)
काय आहे प्रकरण? 

गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे गुन्हेगारांवर कारवाई करत विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड येथील तरुणाकडे पिस्तुल असून तो त्याची विल्हेवाट लावणार असल्याची माहिती मिळाली.
विक्रांत उर्फ मोनु बोरकर तरुणाकडून पिस्तुल, मॅगझिनसह 5 जिवंत काडतूस जप्त
आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंदवला

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लगाम लावण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे गुन्हेगारांवर कारवाई करुन विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्रे बाळगणाऱ्याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास शहरातील श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड येथील तरुणाकडे पिस्तुल असून तो त्याची विल्हेवाट लावणार असल्याची माहिती मिळाली. या आधारावर स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने छापामार कारवाई केली. यावेळी विक्रांत उर्फ मोनु बोरकर याच्या घरून विदेशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिन आणि 5 जिवंत काडतुसासह अवैधरित्या प्रतिबंधित अग्निषस्त्र मिळुन आले.

दरम्यान, त्यास ताब्यात घेतले. त्याला पिस्तूलबाबत विचारणा केली असता त्याने उत्तरे नीट दिली नाही. यानंतर त्याच्या विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंदवला. आरोपीला जप्त पिस्तुल मुद्देमालसह गोंदिया शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत. (Gondia News)
या अधिकाऱ्यांनी केला तपास
या प्रकरणाचा तपास, वरिष्ठांचे निर्देशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, महिला पोलीस उपनिरिक्षक वनिता सायकर, पोलीस हवालदार राजु मिश्रा, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, तुलसी लुटे, नेवालाल भेलावे, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, पोलीस शिपाई संतोष केदार यांनी कारवाई केली.

हेही वाचा 

भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक
Nashik : राजस्थानातून खरेदी केलेले गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त; तिघे ताब्यात
धुळे जिल्ह्यात 27 गुन्ह्यांमध्ये 39 गावठी कट्टे आणि 62 काडतूस जप्त : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड