बिहारमध्ये मतदान केंद्रावर अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

बिहारमध्ये मतदान केंद्रावर अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि. ७) ११ राज्यांमधील ९३ जागांवर मतदान होत आहे. यादरम्यान बिहारमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सुपौल येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली असून शैलेंद्र कुमार असे अधिकाऱ्याचे नाव आहे.

#WATCH | Bihar: A presiding officer at a polling booth in Supaul passed away allegedly due to heart attack. He has been identified as Shailendra Kumar.
Doctor says, “He passed away in the morning…This happened where he was posted. He was rushed to PHC where he was declared… pic.twitter.com/Q8ggZWjqaC
— ANI (@ANI) May 7, 2024

आज सकाळी मतदान सुरू असतानाच शैलेंद्र यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.
तिसऱ्या टप्प्यात एकूण १३३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे. काही लोकसभेच्या जागांवर मतदान ४ वाजता संपेल. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातून १०, गुजरातमधून २५, कर्नाटकातून १४, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातून ९, आसाममधून ४, बिहारमधून ५, छत्तीसगडमधून ७, पश्चिम बंगालमधून ४, दमण दीव आणि दादरा-नगर हवेलीच्या २ जागांवर मतदान होत आहे.
हेही वाचा : 

लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान सुरू
पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क