नागपूरमध्ये आढळली दुर्मिळ पाल

नागपूरमध्ये आढळली दुर्मिळ पाल

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूरमधील पीपला फाटा आउटर परिसरात एक दुर्मिळ पाल सोमवारी (दि.६) आढळून आली. वाईल्डलाइफ वेलफेयर सोसायटीचे सदस्यांना फोनवरुन या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच या संस्थेचे सदस्य गौरांग वाईकर, नीतीश भांदक्कर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तपासणी केली असता, ती एक दुर्मीळ प्रजातीची पाल आहे, असे आढळून आले. (Nagpur News)
गोरेवाडाचे क्यूरेटर दीपक सावंत यांच्याकडे या पालीबद्दल वेलफेयर सोसायटीचे सदस्यांनी विचारणा केली असता, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही पाल दुर्मीळ “गिरी गेकोयेला” (Cyrtodactylus varadgirii) असल्याचे सांगितले. ही पाल २०१६ ला वरदगिरी ह्या वैज्ञानिकाच्या नावे नामांकित करण्यात आली आहे. त्याअगोदर या पालीचे नाव “कोलेगल गेको”  असे होते. ही पाल अत्यंत सुंदर व मनमोहक असून घोणस सापाप्रमाणे दिसते. बहुतांश लोकांमध्ये  ही पाल विषारी असल्याचा गैरसमज आहे. अनेकदा या कारणाने अशा दुर्मीळ जीवांना प्राण गमवावा लागतो. मात्र ही पाल विषारी नसून पर्यावरणासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. सध्या वाढत्या शहरीकरणामूळे अशा दुर्मिळ जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. (Nagpur News)
हेही वाचा :

 भाजप नेते बळवंतराव ढोबळे यांचे निधन
कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
ब्रिजभूषण यांच्या मुलाला तिकीट दिल्याने लोकदल नेत्याचा राजीनामा

Latest Marathi News नागपूरमध्ये आढळली दुर्मिळ पाल Brought to You By : Bharat Live News Media.