‘पाकिस्‍तानने बांगड्या घातलेल्‍या नाहीत’ : फारुख अब्दुल्लांची वादग्रस्त टिप्पणी

‘पाकिस्‍तानने बांगड्या घातलेल्‍या नाहीत’ : फारुख अब्दुल्लांची वादग्रस्त टिप्पणी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : जम्मू आणि काश्मीरमधील विकास बघून पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक आपण होऊनच भारतात येण्यास तयार होतील. भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही,, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्‍यक्‍त केला होता. या विधानावर टीका कराताना जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्‍त विधान केले. ( Farooq Abdullah’s Controversial Comment )
त्‍यांच्‍याकडे अणुबॉम्‍ब आहेत…
राजनाथ सिंह यांच्‍या विधानावर टीका करताना फारुख अब्दुल्ला म्‍हणाले की, पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि त्यांच्याकडे अणुबॉम्ब देखील आहेत जे आमच्यावर पडतील. ( Farooq Abdullah’s Controversial Comment )
काय म्‍हणाले होते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ?
जम्मू आणि काश्मीरमधील विकास बघून पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक आपण होऊनच भारतात येण्यास तयार होतील. भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही,, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्‍यक्‍त केला होता. काश्मीरमधील स्थितीबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील स्थितीत होत असलेली सुधारणा पाहता एक दिवस तेथे अ‍ॅफस्पा लागू करण्याची गरज राहाणार नाही. अर्थात हे माझे मत असून त्याबाबत गृहमंत्रालयच निर्णय घेईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ते म्हणाले, पाकिस्तानचा सीमापार दहशतवादामध्ये असलेला सहभाग जगजाहीर आहे. पाकिस्तानने आता या कारवाया बंद करायला हव्यात. या भागात शांतता राहावी आणि दहशतवादाचा बीमोड व्हावा यावर भारताचा निर्धार कायम असल्याचेही ते म्हणाले होते.
हेही वाचा : 

“…तर काश्‍मीरचे नशीब गाझासारखेच असेल” : फारुख अब्दुल्लांची धक्‍कादायक टिप्‍पणी
इस्रायल- हमास युद्धावर फारुख अब्दुल्लांचे मोठे विधान, “मुस्लिमांकडे सत्ता आहे; पण…”
Farooq Abdullah : नेहरूंच्‍या विचारसरणीला भाजपचा टाेकाचा विराेध कशासाठी? : फारुख अब्दुल्ला