‘मेट गाला’मध्ये नवीन थीम, यावर्षी आलिया भट्टचा सहभाग, जाणून घ्या सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटबद्दल!

‘मेट गाला’मध्ये नवीन थीम, यावर्षी आलिया भट्टचा सहभाग, जाणून घ्या सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटबद्दल!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मेट गाला २०२४ (Met Gala 2024) ची सुरुवात ६ मे पासून झाली आहे. या सोहळ्याचे आयोजन न्यूयॉर्कमध्ये मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये होईल. पण, भारतात, ७ मे ला दुपारी साडेतीन वाजल्यापासून पाहता येईल. फॅशन मॅगझीन वोग द्वारा आयोजित मेट गालाचे टीव्हीवर थेट प्रसारण होत नाही. इन्स्टाग्राम-यूट्यूबसह वोगच्या मीडिया चॅनलवर पाहिलं जाऊ शकतं. (Met Gala 2024)
एका रिपोर्टनुसार, मेट गाला इव्हेंट सायंकाळी साडेपाच वाजता सुरु होईल आणि जवळापास रात्री ८ वाजता सुरु होईल. इव्हेंटच्या रेड कार्पेटव चालण्यासाठी प्रत्येक गेस्टला एक स्लॉट अलॉट करण्यात आलं. ज्यामध्ये ते आपली फॅशन स्टाईल दाखवतात. यावर्षी मेट गालाची थीम स्लीपिंग ब्यूटीज : रीअवेकनिंग फॅशन अशी ठेवण्यात आली आहे. स्लीपिंग ब्युटी थीम अंतर्गत सेलेब्स ऐतिहासिक कॉस्ट्युम्स प्रदर्शित करताना दिसत आहेत. यावेळी मेट गालामध्ये सहभागी होणाऱ्या गेस्ट्सना द गार्डन ऑफ टाईम ड्रेस कोड दिला जाईल. त्याचे नाव जेजीच्या १९६२ च्या शॉर्ट स्टोरीवर ठेवण्यात आला आहे.
Met Gala 2024 चे पाहुणे
मेट गाला 2024 चे गेस्ट जेंड्या, जेनिफर लोपेज, बॅड बन्नी आणि क्रिस हेम्सवर्थ आहेत, जे वोगचे चीफ एडिटर अन्ना विंटोरसोबत या इव्हेंटमध्ये सहभागी होतील. भारतातून आलिया भट्ट यावर्षी मेगा इव्हेंटमध्ये दिसेल. पॉप सिंगर रिहाना देखील सहभागी होईल. मेट गालामध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्याची यादी सीक्रेट ठेवली जाते. जवळपास ४०० पाहुणे मेट गालामध्ये सहभागी होऊ शकतात.