रायगड : भुवनेश्वर येथे राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट, तीघे जखमी

रायगड : भुवनेश्वर येथे राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट, तीघे जखमी

रोहा; पुढारी वृत्तसेवा : रोहा तालुक्यातील भुवनेश्वर कालवा रोड येथे एका घरात सिलिंडरचा सोमवारी (दि. १३) दुपारी स्फोट झाला. या घटनेत घरातील तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे घराला आग लागली असून या आगीमुळे घराचे नुकसान झाले आहे.
रोहा तालुक्यातील वर्षे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर कालवा रोड येथील मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे मनोहर घोसाळकर यांच्या घरातील साहित्य आगीत जळाले आहे. या स्फोटामुळे घरावरील सर्व कौल तुटून नुकसान झाले आहे. आगीत मनोहर अंबाजी घोसाळकर (वय ६२ वर्षे), त्यांची मुलगी भावना घोसाळकर (वय १७ वर्षे), सायली घोसाळकर (वय २३ वर्षे) हे भाजले गेल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील एम.जी. हाॅस्पीटल येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. या स्फोटात घराचे मोठे नुकसान झाले आहे.
आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन पथक बोलाविण्यात आले. अग्नीशमन दलाला आग विझविण्यात यश आले आहे. घटना स्थळी रोहा पोलीस पोहचून घटनेची माहिती घेत पुढील तपास करीत आहेत.
The post रायगड : भुवनेश्वर येथे राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट, तीघे जखमी appeared first on पुढारी.

रोहा; पुढारी वृत्तसेवा : रोहा तालुक्यातील भुवनेश्वर कालवा रोड येथे एका घरात सिलिंडरचा सोमवारी (दि. १३) दुपारी स्फोट झाला. या घटनेत घरातील तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे घराला आग लागली असून या आगीमुळे घराचे नुकसान झाले आहे. रोहा तालुक्यातील वर्षे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर कालवा रोड येथील मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. …

The post रायगड : भुवनेश्वर येथे राहत्या घरात सिलेंडरचा स्फोट, तीघे जखमी appeared first on पुढारी.

Go to Source