“अत्‍यंत पक्षपाती…” : भारताने नाकारला अमेरिकेच्या मानवाधिकार अहवाल

“अत्‍यंत पक्षपाती…” : भारताने नाकारला अमेरिकेच्या मानवाधिकार अहवाल


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भारताविषयी अत्‍यंत कमी समज दर्शवणार आणि अत्‍यंत पक्षपाती असा अहवाल आहे, अशा शब्‍दांमध्‍ये भारताने अमेरिकेच्या मानवाधिकार अहवाल नाकारला आहे. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी हिंसाचारामुळे महत्त्वपूर्ण मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्‍याचे या अहवालात नमूद करण्‍यात आले होते.
आम्‍ही अशा अहवालाला महत्त्‍व देत नाही
गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, ” अमेरिकेचा मानवाधिकार अहवाल अत्यंत पक्षपाती आहे आणि भारताविषयीची अत्यंत कमी समज दर्शवितो. आम्ही त्याला कोणतेही महत्त्व देत नाही.”

#WATCH | On the US State Department report on Human Rights, MEA Spokesperson Randhir Jaiswal says, “This report is deeply biased and reflects a poor understanding of India. We attach no value to it and urge you to do the same.” pic.twitter.com/4XIHgnoswP
— ANI (@ANI) April 25, 2024

खलिस्‍तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनबद्दल आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही उच्च-स्तरीय समिती अमेरिकन बाजूने आमच्याशी सामायिक केलेल्या अनेक माहितीचा शोध घेत आहे. कारण ते आमच्या राष्ट्रीय स्तरावरही तितकेच परिणाम करतात. सुरक्षा उच्चस्तरीय समिती त्या पैलूंवर लक्ष ठेवून आहेत, असेही जैस्‍वाल यांनी यावेळी सांगितले.
मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक संघर्षामुळे “महत्त्वपूर्ण मानवी हक्कांचे उल्लंघन” झाल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘2023 कंट्री रिपोर्ट्स ऑन ह्युमन राइट्स प्रॅक्टिसेस: इंडिया’मध्‍ये नमूद करण्यात आले आहे.
 
 

Go to Source