उंबरमाळी स्थानकात रुळांवर गुरे आल्यामुळे लोकल विस्कळीत

उंबरमाळी स्थानकात रुळांवर गुरे आल्यामुळे लोकल विस्कळीत

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : उंबरमाळी स्थानकात रेल्वे रुळांवर गुरे आल्याने अपघात झाला. त्यामुळे कसारा आणि इगतपुरी दिशेकडील लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
बुधवारी संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उंबरमाळी स्थानकात कसार्‍याच्या दिशेने जाणार्‍या लोकलखाली गुरे आल्याने अपघात झाला. या अपघातामुळे कसारा लोकल स्थानकातच खोळंबली. त्यामुळे या लोकलच्या मागे असलेल्या लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीचे वेळापत्रक पुरते कोलमडले.
या अपघातामुळे सीएसएमटी-हसरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, पनवेल-गोरखपूर, एलटीटी-समस्तीपूर आणि सीएसएमटी-अदिलाबाद एक्सप्रेस रखडल्या. कसार्याच्या दिशेने जाणार्या 3 लोकल खोळंंबल्या होत्या. यामुळे सायंकाळी कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. डाउन दिशेची वाहतूक कोलमडल्याने त्याचा परिणाम अप मार्गावरील (सीएसएमटीच्या दिशेने येणार्‍या) लोकलवर झाला होता. परिणामी कसारा येथून मुंबईकडे जाणार्‍या पुष्पक एक्सप्रेसला कसारा स्थानकात थांबा देऊन लोकल प्रवाशांना प्रवास करण्याकरिता परवानगी दिली होती.