IPLच्या स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत, सायबर पोलिसांनी बजावले समन्स

IPLच्या स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत, सायबर पोलिसांनी बजावले समन्स

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ चे (IPL 2023) बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ चे स्ट्रीमिंग केल्याने वायकॉमचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी तमन्नाला २९ एप्रिल रोजी सायबर पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
याच प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला २३ एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. पण तो चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्याऐवजी त्याने आपले म्हणणे नोंदवण्यासाठी तारीख आणि वेळ मागितली होती. आपण त्या तारखेला भारतात नव्हतो, असे त्याने सांगितले आहे.

Maharashtra Cyber summons actor Tamannaah Bhatia for questioning in connection with the illegal streaming of IPL 2023 on Fairplay App that caused loss of Crores of Rupees to Viacom. She has been asked to appear before Maharashtra Cyber on 29th April.
Actor Sanjay Dutt was also… pic.twitter.com/3Y4TvPHayh
— ANI (@ANI) April 25, 2024