गोंदिया: तिरोड्यातील २४ वर्षीय युवकाचे अपहरण; ४ जणांना अटक  

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तिरोडा येथील संत रविदास वार्डात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचे पाच जणांनी (दि. २१) अपहरण करून चारचाकी वाहनातून नागपूरला पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी शोधमोहीम राबवून (दि.२२) पाच पैकी चार अपहरणकर्त्यांना अटक करून युवकाची सुटका केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये रमणदीपसिंग पन्हेज (वय २३, रा. सिम्बाॅयसिस …

गोंदिया: तिरोड्यातील २४ वर्षीय युवकाचे अपहरण; ४ जणांना अटक  

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील तिरोडा येथील संत रविदास वार्डात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचे पाच जणांनी (दि. २१) अपहरण करून चारचाकी वाहनातून नागपूरला पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी शोधमोहीम राबवून (दि.२२) पाच पैकी चार अपहरणकर्त्यांना अटक करून युवकाची सुटका केली.

अटक केलेल्या आरोपींमध्ये रमणदीपसिंग पन्हेज (वय २३, रा. सिम्बाॅयसिस कॉलेज, वाठोडा), सिद्धांत रघुनाथ गजभिये ( वय २८, रा. वाठोडा), सर्फराज अहमद जलील अहमद अन्सारी (वय ३२, रा. कामठी) आणि सौरभ धनराज मेश्राम ( वय २६, रा. जरीपटका) यांचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा शहरातील संत रविदास वार्ड येथील युवक प्रेम दिलीप कनोजे (वय २४) याचे पाच अज्ञात आरोपींनी रविवारी दुपारच्या सुमारास अपहरण करून त्याला चारचाकी वाहनातून नागपूरला पळवून नेले. या प्रकरणी फिर्यादी दिलीप गैनीराम कनोजे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल जारकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या आदेशावरून तिरोडा पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड, विजयकुमार पुंड, सहायक फौजदार मनोहर अंबुले, अविनाश लोंढे, नीलेश ठाकरे, प्रमोद पाटील यांचे पथक नागपूरला रवाना झाले.

दरम्यान, पोलिसांनी तपासाला गती दिली असता पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपींनी अपहरण केलेल्या तरुणाला एका ठिकाणी सोडून पळ काढला.  मात्र, सोमवारी (दि. 22) पोलिसांनी पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेत अपहृत तरुणाची नागपूर येथून सुटका केली.

 आरोपींकडून चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून आरोपींना २३ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांनाही २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

हेही वाचा
 

राष्ट्रवादीला धक्का! गोदिंयाच्या नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
गोंदिया: चोरखमारा येथे नाल्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Gondia News: गोरेगाव येथे रुग्णालयावर छापा; बोगस डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात