नशिराबाद टोलनाक्याजवळ गुटखा व तंबाखूसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद टोलनाक्याजवळ गुटखा व तंबाखूसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव- नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने कारवाई करत नशिराबाद टोलनाक्याजवळ 28 लाख 68 हजार 940 रुपये किमतीचा पान मसाला, तंबाखू -गुटखा जप्त केला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, एका ट्रक मधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत आहे. त्यानुसार, पथकाने नशिराबाद टोल नाक्याजवळ सापळा लावून आयशर ट्रक क्रमांक (एचआर ३८, टी ५४१०) दि. 23 च्या मध्यरात्री नशिराबाद टोल नाक्याजवळ पकडला. त्यामध्ये चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा गुटखा, सुगंधित पान मसाला आणि तंबाखू आढळून आला. पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अखिल खान सुलतान खान वय-४८, रा. खंडवा, मध्यप्रदेश, फिरोज खान छोटू खान वय-३६ रा. इंदौर, मध्य प्रदेश, संजय (पूर्ण नाव माहित नाही) रा.सेंधवा मध्य प्रदेश आणि करडा (पुर्ण नाव माहित नाही) रा. चाळीसगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.

Lok Sabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान
Chhava Movie : छ. संभाजी महाराजांच्या लूकमधील विकी कौशलचे फोटो लिक