सनरायझर्स हैदराबादच्या नावावर ‘अनोख्या’ विक्रमाची नोंद

सनरायझर्स हैदराबादच्या नावावर ‘अनोख्या’ विक्रमाची नोंद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीनंतर हैदराबादने शाहबाज अहमदच्या अर्धशतकाच्या बळावर 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 266 धावा केल्या. हैदराबादने 250 पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार करण्याची ही तिसरी वेळ आहे. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा हैदराबादचा संघ संयुक्तपणे पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडच्या कौंटी क्लब सरेनेही तीन वेळा टी-20 फॉर्मेटमध्ये 250 हून अधिक धावा केल्या आहेत.
हैदराबादने आरसीबीला टाकले मागे
यंदाच्या हंगामात हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन गड्यांच्या मोबदल्यात 277, आरसीबीविरुद्ध तीन फलंदाज गमावून 287 धावा केल्या होत्या. आणि दिल्लीविरूद्ध 266 धावा उभारल्या. आयपीएल एतिहासामध्ये तीन वेळा 250+ धावा करण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोनदा अशी कामगिरी केली होती, मात्र आता हैदराबादने आरसीबीला याबाबतीत मागे टाकले आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी पाडला षटकारांचा पाऊस
सनरायझर्सने दिल्लीविरुद्धच्या त्यांच्या डावात एकूण 22 षटकार ठोकले. जे आयपीएलमधील कोणत्याही संघाने एका डावात मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. याआधीही हा विक्रम हैदराबादच्याच नावावर होता. त्यांनी याच मोसमात आरसीबीविरुद्ध 22 षटकार ठोकले होते. यामध्ये दुसऱ्या स्थानावर आरसीबी आहे. त्यांनी 2013 च्या हंगामात बेंगळुरू येथे पुणे वॉरियर्सविरुद्ध 21 षटकार ठोकले होते.
आयपीएलमधील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या
आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. त्यांनी दिल्लीविरुद्ध आयपीएलची चौथी सर्वोच्च धावसंख्या उभारली. आजपर्यंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या पाचपैकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक तीन वेळा हैदराबादने सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे. विशेष म्हणजे हैदराबादने या मोसमातच धावसंख्या उभारली आहे.
आयपीएल इतिहासातील जलद 200 धावा
हैदराबादनेही दिल्लीविरुद्ध 14.5 षटकांत दोन 200 धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात जलद 200 केल्या. याआधी आरसीबीविरुद्धही हैदराबादने 14.6 षटकांत 200 धावांचा आकडा पूर्ण केला होता. आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 धावा पूर्ण करण्याचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. त्यांनी 2016 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध 15 षटकांच्या सामन्यात 14.1 षटकात 200 धावा पूर्ण केल्या होत्या. दुसऱ्या स्थानावर हैदराबादचा संघ आहे. त्यांनी याच मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध 14.4 षटकात 200 धावा पूर्ण केल्या होत्या.
हेही वाचा :

रत्नागिरी : लांजातून जाणाऱ्या काजळी नदीच्या पात्रात दोघे भाऊ बुडाले
पंचवटी : म्हसरूळ पोलिसांची कामगिरी! १६ लाखांच्या रोकड लुटीतील संशयित ताब्यात; ४८ तासात तपास
नागपूर : रविवारपासून विदर्भात, वर्धेत शरद पवार, उध्दव ठाकरेंच्या सभा