धाराशिव : सराटी येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाकडून भावाचा खून

धाराशिव : सराटी येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाकडून भावाचा खून

अणदूर, पुढारी वृत्तसेवा: तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे भावकीच्या वादातून व पूर्ववैमनस्यातून चुलत भावाने भावाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना आज (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास घडली. नरसप्पा बाबुराव पाटील (वय ४२, रा. सराटी, ता. तुळजापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. नवनाथ अप्पाराव पाटील (वय ५०) यांनी हा खून केल्याचा आरोप मृताचा भाऊ पंडित बाबुराव पाटील यांनी केला आहे. Dharashiv Crime
नरसप्पा पाटील यांच्यावर पाठीमागून कोयत्याने डोक्यामध्ये व समोरून तोंडावर जबर वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. पंडित पाटील व पुतण्या रमेश पंडित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु, दवाखाना बंद असल्याने त्यांना सोलापूर सिव्हिल शासकीय रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नातेवाईकांनी जोपर्यंत मारेकऱ्याला ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. Dharashiv Crime
हेही वाचा 

धाराशिव : महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन
धाराशिव : उमरग्यात भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सात लाखांची घरफोडी
Maratha Reservation : धाराशिवमध्ये संचारबंदी शिथील, व्यवहार पूर्ववत

The post धाराशिव : सराटी येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाकडून भावाचा खून appeared first on पुढारी.

अणदूर, पुढारी वृत्तसेवा: तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे भावकीच्या वादातून व पूर्ववैमनस्यातून चुलत भावाने भावाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना आज (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास घडली. नरसप्पा बाबुराव पाटील (वय ४२, रा. सराटी, ता. तुळजापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. नवनाथ अप्पाराव पाटील (वय ५०) यांनी हा खून केल्याचा आरोप मृताचा भाऊ पंडित बाबुराव …

The post धाराशिव : सराटी येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाकडून भावाचा खून appeared first on पुढारी.

Go to Source