बर्वे यांचे आमच्यावर खापर का? आशिष जयस्वाल यांचा सवाल

बर्वे यांचे आमच्यावर खापर का? आशिष जयस्वाल यांचा सवाल

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : एखादी व्यक्ती खोटे जात प्रमाणपत्र सादर करून निवडणुकीला सामोरे जात असेल आणि जात पडताळणीत प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अर्ज रद्द झाल्यास आमच्यावर खापर फोडून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ही बाब दुर्दैवी आहे, असा आरोप रामटेकचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांनी आज (दि.४) पत्रकार परिषदेत केला.
सुनील साळवे यांनी आरटीईमध्ये काढलेल्या माहितीनुसार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र खोटे ठरले असून ते जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. एखादा व्यक्ती खोटे जात वैधता प्रमाणपत्र वापरुन लाभ घेत असेल तर ती वैधता जात वैधता पडताळणी समितीने रद्द करावी, अशी तरतूद आहे. या समितीला तसा अधिकार मिळालेला आहे, याकडे लक्ष वेधले.
पुढे बोलताना जयस्वाल म्हणाले की, केवळ रश्मी बर्वे यांचेच जिप सदस्यत्व रद्द झाले नसून माझ्याही अनेक कार्यकर्त्यांचे गोवारो समाजाचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आम्ही कोणावरही खापर फोडले नाही. यामुळेच केवळ राजकीय लाभासाठी रश्मी बर्वे यांनी आमच्या सरकारवर आरोप न करता न्यायालयावर विश्वास ठेवावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रवक्ते चंदन गोस्वामी उपस्थित होते.
हेही वाचा :

..तर निवडणुकांचे पर्व संपून जाईल : नाना पटोले
Sambhaji Raje – Sanjay Mandlik : संभाजीराजे – संजय मंडलिक यांच्या भेटीने चर्चांना उधाण  
Lok Sabha Election 2024 | होऊ दे खर्च..! पण 95 लाखाच्या आत, लोकसभा निवडणुकीत प्रचार खर्चाला मर्यादा

Latest Marathi News बर्वे यांचे आमच्यावर खापर का? आशिष जयस्वाल यांचा सवाल Brought to You By : Bharat Live News Media.