‘हा गरमपणा स्वाभिमानाचा, हुजरेगिरीचा नाही; भाजपचा रामदास कदमांवर निशाणा

‘हा गरमपणा स्वाभिमानाचा, हुजरेगिरीचा नाही; भाजपचा रामदास कदमांवर निशाणा

दापोली; Bharat Live News Media वृत्तसेवा :  विधानसभेच्या  २०१९ च्या निवडणुकीत युती धर्म असताना दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला मतदान करत माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. यावेळी त्यांनी दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनाही लक्ष केले. BJP on Ramdas Kadam
रामदास कदम यांच्या या वक्तव्याचा दापोली मतदारसंघातील भाजप पदाधिकऱ्यांनी निषेध केला आहे.  ‘चहापेक्षा किटली गरम, रामदासभाई कदम, हा गरमपणा स्वाभिमानाचा आहे, हुजरेगिरीचा नाही’, लवकरच उत्तर देणार, असे स्टेटस ठेवत भाजप पदाधिकाऱ्यांनी कदम यांच्यावर  निशाणा साधला आहे. त्यामुळे दापोलीत पुन्हा एकदा महायुतीत भडका उडाला आहे. BJP on Ramdas Kadam
माजी मंत्री कदम यांनी याआधी भाजप नेते व  बांधकाम मंत्री रविंद चव्हाण आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लक्ष केले होते. तर दापोलीत झालेल्या सभेत  कदम यांनी पुन्हा  कोण तो रविंद्र चव्हाण ? असा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर दापोलीत वातावरण तापले होते. असे असताना पुन्हा रामदास कदम यांनी दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांना टार्गेट केल्याने दापोलीतील भाजप पदाधिकारी चांगलेच संतापलेले  आहेत.  या बाबत त्यांनी आपला राग मोबाईल स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, अशी मागणी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होती. तर धैर्यशील पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र, याला राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पूर्णविराम देत सुनील तटकरे हेच उमेदवार असे जाहीर करून टाकले. केंद्रात मोदींची आणि भाजपची सत्ता आली पाहिजे, यासाठी पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करणार असे दापोलीतील भाजप पदाधिकारी सांगत आहेत. असे असताना देखील दापोलीत झालेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना या पदाधिकारी बैठकीत दापोलीत भाजप पदाधिकारी दिसले नाहीत. त्यामुळे दापोलीत युतीतील तणाव अजूनही कायम आहे. अशातच  कदम यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजप पदाधिकारी आणखी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात दापोलीत युतीतील दरी वाढेल की त्यावर पडदा पडेल हे लवकरच दिसेल.
हेही वाचा 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ सोडणार नाही : नारायण राणे
रत्नागिरी-सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा कायम : उदय सामंत
Loksabha Election 2024 : किरण सामंत यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माघार

Latest Marathi News ‘हा गरमपणा स्वाभिमानाचा, हुजरेगिरीचा नाही; भाजपचा रामदास कदमांवर निशाणा Brought to You By : Bharat Live News Media.