जवळाबाजार बसस्थानक परिसरातील अरूंद रस्त्याचा वाहनधारकांना मनस्ताप

जवळाबाजार बसस्थानक परिसरातील अरूंद रस्त्याचा वाहनधारकांना मनस्ताप

जवळाबाजार; Bharat Live News Media वृत्तसेवा : परभणी-हिंगोली मार्गावरील जवळाबाजार बसस्थानक परिसरातील अरूंद रस्त्याचा वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मार्गावर अनेकवेळा वाहतूक कोंडी होत असते, अशावेळी पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
जवळाबाजार बसस्थानक परिसरात चौकातून पुरजळ, परभणी, हिंगोली, गावातील मुख्य मार्ग, असा वर्दीळीचा परिसर आहे. परभणी व हिंगोलीकडे मोठ्याप्रमाणात २४ तास वाहनांची वर्दळ असते. परिसरातील ५० ते  ६० गावातील नागरिक येथील बस स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे नेहमीच या परिसरात प्रवाशांची गर्दी असते. पुरजळ मार्गावर विविध शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ आणि विविध कॉलनी आहेत. तसेच पुरजळ मार्ग-वसमत वाहनधारक याच मार्गावरून प्रवास करतात. गावातील मुख्य मार्ग असतानाही बसस्थानक परिसरात अरूंद रस्ता केला आहे. त्यामुळे नेहमी या मार्गावर वाहतूक कोंडी होते.
बसस्थानक परिसरात प्रवाशी निवारा नसल्याने रस्त्यावरच चालक बस उभी करतात. अशावेळी प्रवाशांची बस धरण्यास धावपळ होते. यावेळी चौकात मोठ्याप्रमाणात वाहनधारकांच्या वाहनांच्या रांगा लागतात. त्यातून जीव मुठीत घेऊन पादचाऱ्यांना जावे लागते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिक करत आहेत.
हेही वाचा : 

निवडणुकीत माझे नाव, फोटो वापरू नका : मनोज जरांगे यांची तंबी
बीड : घोटभर पाण्यासाठी जीवन मरणाची लढाई : परळीच्या लेंडेवाडी गावात भीषण पाणीटंचाई
बीडच्या तरुणासोबतचे फेसबुकवरील चॅटिंग महिलेला पडले महाग! राहत्या घरातच…

Latest Marathi News जवळाबाजार बसस्थानक परिसरातील अरूंद रस्त्याचा वाहनधारकांना मनस्ताप Brought to You By : Bharat Live News Media.