अर्रर्र…खतरनाक! मयंकने टाकला यंदाच्‍या IPL हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

अर्रर्र…खतरनाक! मयंकने टाकला यंदाच्‍या IPL हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या आयपीएल हंगामात दिग्‍गज क्रिकेटपटूंपेक्षा नवोदित खेळाडूंचा बोलबाला सुरु आहे. यामध्‍ये आघाडीचे नाव आहे दिल्‍लीचा वेगवान गोलंदाज मयंक अग्रवाल याचे. त्‍याने मंगळवार, २ एप्रिल रोजी झालेल्‍या सामन्‍यात यंदाच्‍या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकत प्रतिस्‍पर्धी बंगळूरु संघाच्‍या खेळाडूंना धडकी भरवली. त्‍याचबरोबर मैदानावरील बंगळूरुच्‍या चाहत्‍यांना निशब्‍द केले.
१५६.७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला
मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघाचे आव्‍हान होते. चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियमवर हा सामना झाला. प्रथम फलंदाजी करत लखनौने बंगळुरुसमोर १८३ धावांचे लक्ष्‍य ठेवले होते. या सामन्‍यांत लखनौचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने आरसीबीच्‍या फलंदाजांना जखडले. त्‍याने चिन्नास्वामी स्टेडियमवर १५६.७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. हा यंदाच्‍या आयपीएल हंमागातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे.
मंगळवारी झालेल्‍या सामन्‍यात मयंकने जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक ग्लेन मॅक्सवेल याला शून्यावर बाद केले. यानंतर मयंक यादवने आपले आक्रमण सुरूच ठेवत कॅमेरून ग्रीनला तंबूत धाडले. चिन्नास्वामी स्टेडियमवर मयंक यादव यांच्‍या गाेलंदाजीतील वेग आणि नियंत्रणखेळाडूसह प्रेक्षकही थक्क झाले.

𝙎𝙃𝙀𝙀𝙍 𝙋𝘼𝘾𝙀! 🔥🔥
Mayank Yadav with an absolute ripper to dismiss Cameron Green 👏
Head to @JioCinema and @StarSportsIndia to watch the match LIVE#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/sMDrfmlZim
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024

मयंकने अल्‍पावधीत दिग्‍गज क्रिकेटपटूंचे लक्ष वेधले
मयंकाचा वेगवान चेंडूने सारेच आश्चर्यचकित झाले. यंदाच्‍या आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीला मयंकने एकाच सामन्यात 150 किमी प्रतितास वेगाने नऊ चेंडूंचा मारा केला होता. तसेच तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत आणि केवळ 27 धावा दिल्या, त्‍याच्‍या या कामगिरीमुळे एलएसजीला पंजाब किंग्जविरुद्ध हंगामातील पहिला विजय मिळवून दिला होता. त्याची कामगिरी इतकी प्रभावी होती की त्याने ब्रेट ली आणि डेल स्टेन सारख्या क्रिकेटच्या दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्‍यांनी युवा भारतीय वेगवान गोलंदाजाच्‍या कामगिरीचे कौतूक केले आहे.
एलएसजीसंघाने पंजाब किंग्जवर 21 धावांनी विजय मिळवला तेव्हा प्रेक्षकांना चकित केले. त्याच्या उल्लेखनीय गतीने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना अस्वस्थ केले. त्‍याने या सामन्‍यातील चार षटकांत सातत्याने 150 किमी/ताशी आणि त्याहून अधिक वेग नोंदवला. यामुळे त्‍यांना सामनावीराचा बहुमान मिळाला.
कोण आहे मयंक यादव?
17 जून 2002 रोजी जन्मलेला मयंक हा वेगवान गोलंदाजीमध्ये विशेष कौशल्य असलेला गोलंदाज आहे, LSG त्यांच्या संघात समाविष्ट करण्यास उत्सुक होता. हंगामापूर्वी ‘एलएसजी’चे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी या वेगवान गोलंदाजाला चमक दाखवण्यासाठी पाठिंबा दिला होता.

Raftaaaar 🔥#RCBvLSG #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/tPQiPVRS2G
— JioCinema (@JioCinema) April 2, 2024

हेही वाचा : 

IPL 2024 Schedule : आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल! ‘या’ सामन्यांच्या तारखा बदलल्या
IPL 2024, MI captaincy row : रोहित शर्मा पुन्‍हा मुंबईचा कर्णधार होईल : माजी क्रिकेटपटूचा दावा
Mayank Yadav IPL 2024 : आयपीएलचा नवा स्पीड स्टार मयंक यादव कोण आहे?

The post अर्रर्र…खतरनाक! मयंकने टाकला यंदाच्‍या IPL हंगामातील सर्वात वेगवान चेंडू appeared first on Bharat Live News Media.