रायगड : कोलाड येथे कार-ट्रेलरचा भीषण अपघात; २ जण ठार

रायगड : कोलाड येथे कार-ट्रेलरचा भीषण अपघात; २ जण ठार

कोलाड ; विश्वास निकम मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथे ग.द.तटकरे हायस्कूलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडतांना कारला भरधाव वेगात आलेल्‍या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला.
या विषयी सविस्‍तर वृत्‍त असे की, वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री २३.१० वाजता मुंबई-गोवा महा कोलाड मार्गावरील कोकण रेल्वे पुलाखालून कोलाड हायस्कूलकडे रस्ता ओलांडून जाणाऱ्या कार क्रमांक क्र.एम एच ४७/डब्लू १७६५ ला गोवा बाजुकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलर क्रमांक एम एच ४३ बिएक्स ९५१९ ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात योगेश सुधाकर गुरव रा. वैभव नगर वरसे ता. रोहा, परेश नामदेव खांडेकर रा.राम मंदिर जवळ, मराठा आळी, अष्टमी रोहा यांचा जागीच मृत्यू झाला. योगेश मनोहर पाटील रा. वरसे हा गंभीर जखमी झाला आहे.
यावेळी ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव रा.चरणदिप घाट मलकापूर, संभल उत्तर प्रदेश याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा शैलेश काळे, सपोनि एन एम मोहिते कोलाड कोलाड पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, त्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एन एल चौधरी, पोलिस हवालदार एन व्हाय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा : 

Lok Sabha Election : काँग्रेसला 5 जागा सोडाव्या लागणार; ठाकरे, पवार गट मारणार बाजी

Lok Sabha Election 2024 : राजकारणातील ओबीसी समाजाचे स्थान

Lok Sabha Election 2024 : कर्नाटकात बंडखोरांची डोकेदुखी; सर्व पक्षांपुढे नाराजांना सांभाळण्याचे मोठे आव्हान

Latest Marathi News रायगड : कोलाड येथे कार-ट्रेलरचा भीषण अपघात; २ जण ठार Brought to You By : Bharat Live News Media.