अभिनेते मिलिंद शिंदे-वीणा जामकर ठेऊन येताहेत “परंपरा”

अभिनेते मिलिंद शिंदे-वीणा जामकर ठेऊन येताहेत “परंपरा”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विविध परंपरा आहेत. या परंपरा पाळताना अनेकदा आर्थिक ओझंही येतं. अशाच एका परंपरेची गोष्ट “परंपरा” या आगामी चित्रपटात मांडली जाणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला ‘परंपरा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबोलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रणय निशिकांत तेलंग यांचे आहे. चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे, अभिनेत्री वीणा जामकर, प्रकाश धोत्रे, अरूण कदम, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमाण, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांच्या उत्तम भूमिका आहेत.
चित्रपटाची पटकथा प्रणय निशिकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे संगीत आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Marathi 💯❤️‍🔥 (@marathi_divas_hd)

Latest Marathi News अभिनेते मिलिंद शिंदे-वीणा जामकर ठेऊन येताहेत “परंपरा” Brought to You By : Bharat Live News Media.