परभणी : विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू

परभणी : विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू

चारठाणा; Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतातून गेलेल्या महावितरणाच्या तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. चारठाणा परिसरातील विशाल राऊत यांच्या शेतात आज (दि.२) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, चारठाणा येथील शेतकरी विशाल राऊत यांच्या शेताजवळ महावितरणाची विद्युत वाहक तार तुटून पडली आहे. याबाबत अनेकदा विशाल राऊत यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना सांगितले. पण त्यांनी याची दखल घेतली नाही. आज सकाळी नऊच्या सुमारास विशाल राऊत यांनी आपल्या शेतालगत जनावरे चरण्यासाठी सोडली. यावेळी तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने यातील एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे १ लाखाचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : 

Sangli News: आगळगाव येथे भीषण अपघातात ३ ऊस तोडणी कामगारांसह चिमकुली ठार
Jalgaon News | ठेकेदाराचा शॉर्टकट, नागरिकांचे जीव धोक्यात
हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू

Latest Marathi News परभणी : विद्युत तारेच्या स्पर्शाने म्हशीचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.