T20 World Cup: इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का; बेन स्टोक्स T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही

T20 World Cup: इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का; बेन स्टोक्स T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने यावर्षी जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एका निवेदनाद्वारे याला दुजोरा दिला आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेपूर्वी इंग्लंड संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. T20 World Cup Ben Stokes
अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदासाठी 1 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. त्याच वेळी, त्याचा अंतिम सामना बार्बाडोसमध्ये 29 जून रोजी होणार आहे. T20 World Cup Ben Stokes
बेन स्टोक्सने आपल्या निर्णयावर सांगितले की, ‘मी कठोर परिश्रम करत आहे आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलू म्हणून माझी भूमिका निभावण्यासाठी माझा गोलंदाजी फिटनेस मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आयपीएल आणि विश्वचषक न खेळणे हे मला भविष्यात अष्टपैलू खेळाडू बनण्यास मदत करेल.
T20 World Cup Ben Stokes : स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा
32 वर्षीय बेन स्टोक्सच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार हून अधिक धावा आहेत. त्याने 102 कसोटी सामन्यांमध्ये 13 शतके, 1 द्विशतक आणि 31 अर्धशतकांसह 6316 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 114 सामन्यांमध्ये 5 शतके आणि 24 अर्धशतकांसह 3463 धावा केल्या आहेत.
स्टोक्स टी-20 आंतरराष्ट्रीय 44 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतकांसह 935 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 298 विकेट आहेत.

T20 World Cup | England all-rounder Ben Stokes will play no part in this summer’s tournament.
(File pic) pic.twitter.com/LVjImO9E9d
— ANI (@ANI) April 2, 2024

हेही वाचा 

यूएई बनतेय जागतिक ‘स्पोर्टस् हब’
स्पोर्टस् अँकर मयंती लँगर परतणार
T20 World Cup 2026 : २०२६ चा टी-२० वर्ल्डकप भारत, श्रीलंकेत होणार

Latest Marathi News T20 World Cup: इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का; बेन स्टोक्स T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही Brought to You By : Bharat Live News Media.