पुणे : सलग सुट्यांची संधी साधून वृक्षतोड : अधिकारी अनभिज्ञ

पुणे : सलग सुट्यांची संधी साधून वृक्षतोड : अधिकारी अनभिज्ञ

सहकारनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेला सलग सुट्या असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी सुटीनिमित्त बाहेरगावी जातात. काही कर्मचारी, अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत. उद्यान विभागाचेही कर्मचारी निवडणूक कामात गुंतले असल्यामुळे सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, पठार भागात खासगी वृक्षतोड करणारे ठेकेदार सुटीच्या दिवशी मात्र वृक्षतोड करतात. कुठल्याही प्रकारे महापालिकेचा उद्यान विभागाचा वृक्षतोड परवाना नसताना गॅरेजमालकांनी थेट ठेकेदाराकडून प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली.
हा वृक्षतोडीचा राजरोस धंदा सुटीच्या दिवशी अनेक वेळा मोठ्या प्रमाणात चालतो. आमच्या सोसायटीच्या जवळपास ठिकाणी दर रविवारी व सुटीच्या दिवशी आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे तोडली जातात. याबाबत उद्यान विभाग व वृक्षतोड ठेकेदार यांचे साटेलोटे असल्यामुळे सुटीच्या दिवशीच वृक्षतोड केली जाते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
पद्मावती, धनकवडी विभागात वृक्षतोड झालेली तक्रार माझ्याकडे आली आहे. संबंधित जागा मालकावर रीतसर खटला दाखल करून पुढील कार्यवाहीसाठी याबाबत अहवाल पाठवला जाणार आहे..
– धनंजय सोनवणे, उद्यान विभाग, महापालिका.

हेही वाचा

नवी मुंबईतील महापेत केमिकल कंपनीला भीषण आग
Accident News : दरी पुलाजवळ टेम्पोला अपघात
Maharashtra Sadan Scam : उच्च न्यायालयाची सुनावणी; भुजबळांसह सर्व आराेपींना नाेटीस

Latest Marathi News पुणे : सलग सुट्यांची संधी साधून वृक्षतोड : अधिकारी अनभिज्ञ Brought to You By : Bharat Live News Media.