माझ्‍यासह ‘आप’च्‍या तीन नेत्‍यांना ‘ईडी’ अटक करणार : आतिशी यांचा दावा

माझ्‍यासह ‘आप’च्‍या तीन नेत्‍यांना ‘ईडी’ अटक करणार : आतिशी यांचा दावा


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) माझ्या घरावर छापा टाकू शकते. येत्या काही दिवसांत माझ्‍यासह आम आदमी पार्टीचे नेते सौरव भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दुर्गेश पाठक यांनाही अटक केली जाऊ शकते, असा खळबळजनक दावा आम आदमी पार्टीच्‍या नेत्‍या आणि दिल्‍लीच्‍या मंत्री आतिशी मार्लेना यांनी आज (दि.२ एप्रिल) पत्रकार परिषदेत केला. अरविंद केजरीवाल हे मुख्‍यमंत्रीपदाचा राजीना देणार नाहीत, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. ( Atishi Claimed She Will Be Put In Jail )
भाजपने दिली ऑफर : अतिशी
भाजपच्या एका नेत्याने आपल्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधल्याचा दावाही या वेळी आतिशी यांनी केला . राजकीय करिअर वाचवायचं असेल लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करावा, अन्यथा अटकही केली जाईल, असेही आपल्‍याला सांगण्‍यात आल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. भाजपला आम आदमी पार्टीला चिरडायचे आहे. त्‍यामुळे लवकरच सौरव भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दुर्गेश पाठक यांनाही अटक केली जाईल. त्यांच्या घरांवरही छापे टाकले जातील आणि त्यानंतर समन्स पाठवले जातील, असा दावाही त्‍यांनी केला. ( Atishi Claimed She Will Be Put In Jail )
भाजपच्या या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही
या वेळी आतिशी म्हणाले की, “येत्या काही दिवसांत मला, दुर्गेश, सौरभ भारद्वाज आणि राघव चढ्ढा यांना तुरुंगात टाकले जाईल. येत्या काही दिवसांत माझ्या घरावर, माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या घरांवर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरांवर ईडी छापे टाकणार आहे. यानंतर आम्हाला समन्स पाठवण्यात येईल. त्यानंतर आम्हा चौघांना अटक करण्यात येईल; पण आम्ही भगतसिंगांचे शिष्य आहोत. भाजपच्या या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही.”
ईडीच्या तपासात आतिशी आणि सौरभची नावे प्रथमच समोर आली आहेत एएसजी एसव्ही राजू यांनी ईडीतर्फे हजर राहून सांगितले की, अरविंद केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत आणि तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘ईडी’च्‍या अधिकार्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार चौकशीत केजरीवाल यांनी सांगितले की, विजय नायर यांनी कधीही त्यांची तक्रार केली नाही. पण तो आतिशी आणि सौरभ भारद्वाजला रिपोर्ट करायचा.
केजरीवाल यांनी दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे आता ईडी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची चौकशी करु शकतात. विजय नायरवर दारू व्यावसायिक समीर महेंद्रू याच्याशी जवळच्या साथीदारामार्फत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्‍यामुळे पैशाच्या व्यवहाराचे हे प्रकरण आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाजपर्यंतही पोहोचू शकते. त्यामुळे या दोन नेत्यांवरही ईडी आपली पकड घट्ट करू शकते. याप्रकरणी दिल्ली सरकारचे आणखी एक मंत्री कैलाश गेहलोत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. ( Atishi Claimed She Will Be Put In Jail )

Senior AAP Leader and Minister @AtishiAAP Addressing an Important Press Conference l LIVE https://t.co/N6FA8olWp8
— AAP (@AamAadmiParty) April 2, 2024

The post माझ्‍यासह ‘आप’च्‍या तीन नेत्‍यांना ‘ईडी’ अटक करणार : आतिशी यांचा दावा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source