विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही : राजस्थान उच्च न्यायालय

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही : राजस्थान उच्च न्यायालय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थान उच्च न्यायालयाने लैगिंक संबंधा संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, दोन सज्ञान जोडप्यामध्ये परस्पर संमतीने जर शारिरिक संबंध प्रस्तापित होत असतील तर हा कायदेशीर गुन्हा नाही. न्यायमूर्ती बिरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, जेव्हा दोन प्रौढ विवाहबाह्य संमतीने लैंगिक संबंध ठेवतात. तेव्हा तो कायदेशीर गुन्हा नाही असं स्पष्ट केलं आहे.
पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप करणाऱ्या एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच राजस्थान उच्च न्यायालयाने हा निकाल दिली आला आहे. तथापि, संबंधित महिला स्वत:हून न्यायालयात हजर राहिली आणि अपहरण झाले नसल्याची माहिती दिली. या माहितीनंतर संबंधित महिलेने एका आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये प्रवेश असल्याचे सांगितले.  त्यानंतर सुनावणी दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला की, महिलेने आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे, त्यामुळे हा आयपीसी कलम 494 आणि 497 अंतर्गत गुन्हा असल्याचे सांगण्यात आले.
Latest Marathi News विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही : राजस्थान उच्च न्यायालय Brought to You By : Bharat Live News Media.