नागपूर: दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय काळजी घ्या, पोलिसांचे आवाहन

नागपूर: दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय काळजी घ्या, पोलिसांचे आवाहन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. सलग सुटीमुळे पर्यटन, देवदर्शन करणाऱ्यासाठी बाहेर जाणाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांकडून पाळत ठेवली जाते. अशा स्थितीत चोरीच्या घटनांची दाट शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नोकरीनिमित्त शहरासह ग्रामीण भागात स्थायिक झालेले नागरिक दिवाळीनिमित्त आपल्या मूळगावी जातात. आता शाळांनाही दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने काही घरे आतापासून कुलूपबंद दिसून येत आहे. अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे. मात्र, दिवाळीसाठी गावी किंवा फिरायला इतरस्त्र कुठे जात असाल आणि घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास या काळात चोरटे घरात दिवाळी साजरी करतील, असे व्हायला नको.
आपले घर बंद ठेवून बाहेरगावी फिरायला अथवा देवदर्शनाला गेले असल्यास आपले लोकेशन, फोटो, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया ॲप टाकू नयेत, त्यामुळे चोरट्यांना आपले घर बंद आहे. किती दिवस बंद राहील, घरी कोणीही नाही, हे कळेल व ते आपल्या पैशांवर दागिन्यांवर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असेही आवाहन पोलिसांनी यावेळी केले.
हेही वाचा 

नागपूर : दिवाळीसाठी गावी जाऊ दिले नाही, बोनस दिला नाही म्हणून ढाबा मालकाची २ नोकरांकडून हत्या
नागपूर: ग्रा.पं. निवडणुकीत विजय झालेल्या भाजप नेत्याचा खून
नाशिकचे शेतकरी नागपूर अधिवेशनात करणार अन्नत्याग आंदोलन

The post नागपूर: दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय काळजी घ्या, पोलिसांचे आवाहन appeared first on पुढारी.

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. सलग सुटीमुळे पर्यटन, देवदर्शन करणाऱ्यासाठी बाहेर जाणाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांकडून पाळत ठेवली जाते. अशा स्थितीत चोरीच्या घटनांची दाट शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नोकरीनिमित्त शहरासह ग्रामीण भागात स्थायिक झालेले नागरिक दिवाळीनिमित्त आपल्या मूळगावी जातात. …

The post नागपूर: दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताय काळजी घ्या, पोलिसांचे आवाहन appeared first on पुढारी.

Go to Source