परभणी: परभणी- संभाजीनगर मार्गावर ३ दिवस लाईन ब्लॉक; रेल्वे उशिराने धावणार

परभणी: परभणी- संभाजीनगर मार्गावर ३ दिवस लाईन ब्लॉक; रेल्वे उशिराने धावणार

परभणी, Bharat Live News Media वृत्तसेवा :  परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गावरील सेलू ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान दि. 2, 6 व 9 एप्रिलरोजी लाईन ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरील काही रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाद्वारे आज (दि.१)  देण्यात आली आहे.
सेलू ते ढेंगळी पिंपळगाव मार्गावर घेण्यात येणार्‍या या लाईन ब्लॉकमुळे सीएसटी मुंबई ते नांदेड ही तपोवन एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान 135 मिनीटे उशिराने धावणार आहे. नगरसोल-नरसापूर (गाडी क्र.12788) एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान 105 मिनीटे उशिरा धावणार आहे. नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस (गाडी क्र.17232) ही जालना ते सेलू दरम्यान 105 मिनीटे उशिरा धावेल.
नांदेड-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र.17630) ही नांदेड-मानवत रोड दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल. तर काचिगुडा-रोटेगाव एक्सप्रेस (गाडी क्र.17661) ही 240 मिनीटे उशिरा धावेल. याबरोबर औरंगाबाद-हैद्रबाद एक्सप्रेस (गाडी क्र. 17650) ही  दि. 2, 6 व 9 एप्रिलरोजी औरंगाबाद येथून 125 मिनीटे उशिराने धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
हेही वाचा 

Mahadev Jankar : परभणी: महादेव जानकरांचा शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल
परभणी: अपघातात गंभीर जखमी झालेल्या ममदापूरच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
परभणी: दस्तापूर-लोहगाव येथील पुलाला दुचाकी धडकून ममदापूरचा तरुण गंभीर जखमी

Latest Marathi News परभणी: परभणी- संभाजीनगर मार्गावर ३ दिवस लाईन ब्लॉक; रेल्वे उशिराने धावणार Brought to You By : Bharat Live News Media.