भावना गवळी यांना उमेदवारी द्या, अन्यथा…; शिवसैनिक आक्रमक

भावना गवळी यांना उमेदवारी द्या, अन्यथा…; शिवसैनिक आक्रमक

वाशिम: Bharat Live News Media वृत्तसेवा: यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भावना गवळी यांची उमेदवारी अद्याप घोषित झाली नाही, त्यांची उमेदवारी आज तत्काळ घोषित करावी, अथवा आम्ही राजीनामे देऊ, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी वाशिम येथे झालेल्या बैठकीत दिला आहे. Yavatmal – Washim Lok Sabha
लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या शिंदे गटाच्या भावना गवळी यांची उमेदवारी अद्यापही घोषित करण्यात आली नाही. भावना गवळी यांची उमेदवारी तात्काळ घोषित करावी, अन्यथा पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे देतील, असा निर्धार करण्यात आला आहे. Yavatmal – Washim Lok Sabha
भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. त्यांच्या जागेवर संजय राठोड यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. मात्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात भावना गवळी यांनाच तिकीट देण्यात यावे. महायुतीने जर दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिले, तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ आणि महायुतीने दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही करणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
हेही वाचा 

वाशिम: रिसोडमधून मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; वाड्या-वस्त्या ओसाड
वाशिम : कारंजा ते अमरावती रस्त्यावर कारमध्ये ३६ लाखांची रक्कम; स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई
वाशिम नगरपरिषदेकडून शहरात दूषित पाणीपुरवठा

Latest Marathi News भावना गवळी यांना उमेदवारी द्या, अन्यथा…; शिवसैनिक आक्रमक Brought to You By : Bharat Live News Media.