१ एप्रिलला तेजीचा बहार! सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर, गुंतवणूकदारांनी कमावले ६.३८ लाख कोटी

१ एप्रिलला तेजीचा बहार! सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर, गुंतवणूकदारांनी कमावले ६.३८ लाख कोटी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराने २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार सलामी दिली. शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रांत तेजी राहिली. सोमवारी (१ एप्रिल) सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांकी विक्रम नोंदवला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७४,२५४ च्या अंकांला स्पर्श केला. तर निफ्टीने २२,५२९ चा नवा उच्चांक गाठला. त्यानंतर सेन्सेक्स ३६३ अंकांनी वाढून ७४,०१४ वर स्थिरावला. तर निफ्टी १३५ अंकांनी वाढून २२,४६२ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)
ऑटो वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज तेजीत व्यवहार केला. मेटल, पॉवर, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, रियल्टी निर्देशांक १-३ टक्क्यांनी वाढले. तर ऑईल आणि गॅस, आयटी, बँक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास ३ टक्क्यांनी वाढून बंद झाला.
गुंतवणूकदारांना ६.३८ लाख कोटींचा फायदा
बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ६.३८ लाख कोटी रुपयांनी वाढून ३९३.३५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. २८ मार्च रोजी बाजार भांडवल ३८६.९७ लाख कोटी रुपये होते.
संबंधित बातम्या

अर्थवार्ता- निफ्टीमधील ५० पैकी ‘या’ ४८ समभागांत वाढ
२०२३ -२४ वर्षात गुंतवणूकदारांना ‘या’ शेअर्सनी मिळवून दिला भरघोस परतावा

‘हे’ शेअर्स तेजीत
सेन्सेक्स आज ७३,९६८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ७४,२५४ अंकांपर्यंत वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, एलटी, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, विप्रो, एशियन पेंट्स, टीसीएस हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर टायटन, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, डिव्हिज लॅब, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांदरम्यान वाढले. तर आयशर मोटर्स, टायटन, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले.
गुंतवणूकदार सुखावले
फायनान्सियल सर्व्हिसेस आणि मेटल स्टॉक्समधील तेजी आणि अमेरिकेतील महागाईत काही प्रमाणात झालेली घट यामुळे गुंतवणूकदार सुखावले. याचे सकारात्मक परिणाम आज बाजारात दिसून आले. आता गुंतवणूकदारांचे लक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीकडे लागले आहे. ही बैठक ३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवला आहे. तसेच जानेवारी-मार्च दरम्यान तिमाहीचे अहवाल, परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात ओघ, कच्च्या तेलाचे दर आणि इतर जागतिक संकेत याकडेही गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. (Stock Market Closing Bell)
परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला
२०२३ च्या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचा विक्रीवर अधिक जोर राहिला होता. पण २०२४ च्या आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात ओघ वाढला. त्यांनी या वर्षात भारतीय शेअर बाजारात सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. किरकोळ गुंतवणूकदारांसह परदेशी आणि देशांतर्गत अशा दोन्ही संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजाराला आर्थिक वर्ष २०२४ मध्ये नवे शिखर गाठण्यास मदत झाली आहे.
 हे ही वाचा :

सोने एका दिवसात १,७०० रुपयांनी महागले, जाणून घ्या आजचा प्रति तोळा दर
“हा केवळ ट्रेलर..!” गेल्या १० वर्षात देशातील अर्थव्यवस्थेत परिवर्तन, पीएम मोदींनी केले RBIचे कौतुक
देशाचा GDP मजबूत, महागाई नियंत्रणात : RBI गर्व्हनर शक्तिकांत दास

Latest Marathi News १ एप्रिलला तेजीचा बहार! सेन्सेक्स, निफ्टी नव्या उच्चांकावर, गुंतवणूकदारांनी कमावले ६.३८ लाख कोटी Brought to You By : Bharat Live News Media.