सोलापूर, माढ्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर

सोलापूर, माढ्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआपासून दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसऱ्या यादीत वंचितने मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली असून, यात सोलापूरमधून राहुल काशिनाथ गायकवाड तर माढ्यातून – रमेश बारसकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी
हिंगोली – डॉ. बी. डी. चव्हाण, लातूर – नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड, माढा – रमेश बारसकर, सातारा – मारुती धोंडीराम जानकर, धुळे – अब्दुल रहेमान, हातकणंगले – दादासाहेब चवगौंडा पाटील, रावेर – संजय पंडित ब्राम्हणे, जालना – प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य – अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – काका जोशी  अशा ११ उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली असून त्यात विविध जातीधर्मातील लोकांना स्थान देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
Latest Marathi News सोलापूर, माढ्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.