मनारा चोप्राच्या वाढदिवसाला प्रियांका हॉट व्हाईट ड्रेसमध्ये

मनारा चोप्राच्या वाढदिवसाला प्रियांका हॉट व्हाईट ड्रेसमध्ये

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय स्टार प्रियांका चोप्रा व तिचा पती, गायक निक जोनास दोघेही दोन आठवड्यांपासून भारतात आहेत. आधी प्रियांका लेक मालतीला घेऊन भारतात आली. त्यानंतर दोन दिवसांनी निक भारतात आला. दोघांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले व नोएडामध्ये कुटुंबाबरोबर होळी सेलिब्रेशन केले. त्यानंतर आता ते मनाराच्या वाढदिवसासाठी मुंबईला आले. ( Priyanka Chopra-Nick Jonas )
संबंधित बातम्या 

ShahRukh Khan : अनन्या पांडे शाहरूख खानची लकी चार्म
Crew Box Office Collection : तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’ दोन दिवसांत १८ कोटींच्या घरात
Alia Bhatt : आलिया भट्टने लंडनमध्ये गायिले ‘इक कुडी’

अभिनेत्री व ‘बिग बॉस 17’ची फायनलिस्ट मनारा चोप्राचा शुक्रवारी (29 मार्च) वाढदिवस होता. तिच्या 33 व्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. प्रियांका ही मनाराची चुलत बहीण आहे. लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये मनारा खूप सुंदर दिसत होती, तर बहिणीच्या वाढदिवसासाठी प्रियांकाने पांढर्‍या रंगाचा ड्रेस निवडला होता. निक जोनास ट्रान्स्परंट शर्ट व कॅज्युअल पँटमध्ये या सेलिब्रेशनसाठी पोहोचला.
निक व प्रियांका वेळ काढून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आले त्याबद्दल मनाराने त्यांचे आभार मानले. ‘प्रियांका दिदी आणि निक जीजू दोघेही आलेत. घरातील सदस्य आले की, वाढदिवस अजून खास होतो. त्यांनी त्यांच्या व्यग्र शेड्यूलमधून माझ्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, सर्वांचे खूप खूप आभार,’ असं मनारा म्हणाली. ( Priyanka Chopra-Nick Jonas )

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Latest Marathi News मनारा चोप्राच्या वाढदिवसाला प्रियांका हॉट व्हाईट ड्रेसमध्ये Brought to You By : Bharat Live News Media.