हेमा मालिनींविरोधात बॉक्सर विजेंद्र सिंह निवडणूक लढवणार ?

हेमा मालिनींविरोधात बॉक्सर विजेंद्र सिंह निवडणूक लढवणार ?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस पक्ष मथुरा लोकसभा मतदारसंघातून ( Lok Sabha 2024 ) भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता माजी बॉक्सर ( Boxer Vijender Singh )  आणि काँग्रेस नेता विजेंद्र सिंह  याला उमेदवारी देईल, अशी चर्चा सुरु झाला आहे. आता सलग दोनवेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्‍या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्‍यासमोर विजेंद्र सिंह याचे आव्‍हान असणार आहे.
दोनवेळा खासदार राहिलेल्या चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांना आरएलडीचाही पाठिंबा आहे. मथुरा लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.
हेमा मालिनी यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये मथुरा लोकसभेतून विजय मिळवला होता. मागील लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी यांच्याविरोधात 12 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसने महेश पाठक, राष्ट्रीय लोकदलाने कुंवर नरेंद्र सिंह, स्वतंत्र जनता पक्षाने ओम प्रकाश यांना उमेदवारी दिली होती. मात्र हेमा मालिनी यांनी विजय मिळवला होता. 2014 मध्येही हेमा मालिनी येथे विजयी झाल्या होत्या. भाजपने हेमा मालिनी यांना सलग तिसऱ्यांदा मथुरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्‍ये काँग्रेस पक्षाची समाजवादी पार्टीबरोबर आघाडी आहे. या आघाडीअंतर्गत काँग्रेसला लोकसभेच्या १७ जागा मिळाल्या आहेत. यापैकी पक्षाने आतापर्यंत 13 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर चार जागांवर पक्षात मंथन सुरू आहे. काँग्रेसने अद्याप मथुरा लोकसभा जागेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. या जागेवर भाजपने पुन्हा एकदा हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून त्या सलग दोनवेळा विजयी झाल्या आहेत. यावेळी हेमा मालिनी विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी या जागेवर काही तरी नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे.
विजेंद्र सिंह यांच्या नावाची चर्चा
मथुरामध्‍ये काँग्रेस पक्ष बॉक्सर विजेंद्र सिंग याला उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. त्यांच्या नावावर पक्षात मंथन सुरूच आहे.या जागेसाठी आणखी काही नावे शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे, मात्र विजेंद्र सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसने 28 मार्च रोजी यूपीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर काँग्रेसने डॉली शर्माला गाझियाबादमधून उमेदवारी दिली होती.
हेही वाचा : 

Lok Sabha Election BJP Manifesto Committee | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ‘जाहीरनामा’ समिती गठीत; ‘या’ नेत्यांकडे जबाबदारी
Lok Sabha Election 2024 | महायुती फार काळ टिकणार नाही; लोकसभेपूर्वीच गिरीश महाजनांनी दिले संकेत

 
Latest Marathi News हेमा मालिनींविरोधात बॉक्सर विजेंद्र सिंह निवडणूक लढवणार ? Brought to You By : Bharat Live News Media.