पैठण: नेहा पैठणकर ठरल्या नाथांच्या वाड्यातील रांजण भरण्याच्या मानकरी

पैठण: नेहा पैठणकर ठरल्या नाथांच्या वाड्यातील रांजण भरण्याच्या मानकरी

पैठण, Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण येथील श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या नाथवाड्यातील पांडुरंगाने बारा वर्षे नाथाघरी कावडीने पाणी भरले. हा पवित्र रांजण तुकाराम बीज या दिवशी गोदावरीतील पाणी टाकून भरण्यास प्रारंभ केला होता. यावर्षी रांजण भरण्याचा मान नेहा मकरंद पैठणकर यांना मिळाला. मंदिराचे सालकरी उल्काताई रघुनाथबुवा पालखीवाले यांच्या हस्ते नेहा यांची खणा नारळाने ओटी भरून पुजन केले.
या सोहळ्यानंतर नाथषष्ठी पारंपरिक उत्सवाला सुरुवात झाली होती. आज (दि.३०) सकाळी ७ वाजता मंदिराचे सालकरी रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणात गोदावरीचे पवित्र जल टाकण्यास भक्तीभावाने सुरूवात झाली.
यावेळी रेखाताई कुलकर्णी, माधुरी पांडव, ऐश्वर्या पालखीवाले, अपूर्वा पालखीवाले, ह.भ प. ज्ञानेश महाराज, योगेश महाराज गोसावी पालखीवाले, सचिन पांडव, रवींद्र पांडव आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

पैठण : आडुळ येथे समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
छ.संभाजीनगर: पैठण तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकीसह लाखोंचा मुद्देमाल लंपास
Nashik,Yeola Paithani Saree : हॉलमार्किंग, क्यू आर कोडने अस्सल पैठणीचे ब्रँडिंग

Latest Marathi News पैठण: नेहा पैठणकर ठरल्या नाथांच्या वाड्यातील रांजण भरण्याच्या मानकरी Brought to You By : Bharat Live News Media.