जागा वाटपाचे उद्या चित्र स्पष्ट होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

जागा वाटपाचे उद्या चित्र स्पष्ट होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. दरम्यान महायुतीबाबत जागा वाटपाबद्दल विचारले असता पवार म्हटले की उद्या महायुतीची पत्रकार परिषद आहे त्यामुळे उद्या चित्र स्पष्ट होईल. अजित पवार यांची आज कुस्तीपटू यांच्याशी बैठक झाली. सातारा, माढा, नाशिक मधील काही लोकं भेटायला येणार आहेत. युतीचे उमेदवार कसे निवडून जातील याचे नियोजन करतो आहे. प्रत्येकाने काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे.
आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करतो आहेत. काही बातम्या अत्यंत दाधंत खोट्या दिल्या जातात पण वस्तुस्थिती सांगा हे माझं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलतांना पवार म्हटले की प्रकाश आंबेडेकर हे वंचित चे प्रमुख नेते आहेत. त्यांची मोठी ताकद आहे त्यांनी उमेदवार उभे केले आणि महाविकास आघाडी चे उमेदवार पराभूत झाले. आंबेडकर यांची आघाडीसोबत चर्चा सुरू होती. शेवटी कोणी कोणाबरोबर जावे? हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी काय निर्णय घेतला मला माहिती नाही. अमोल कोल्हे आणि धैर्यशील मोहिते यांच्याबाबत प्रश्न विचारताच पवार बोलले की दुसऱ्या पक्षातील संदर्भात काय प्रश्न मला विचारता? मी माझा पक्षाचे उत्तर देऊ शकतो.
हेही वाचा

‘इथे’ पोलिस चक्क रेड्यावर बसून घालतात गस्त!
Foot Health : पादत्राणांची निवड आणि पायांचे आरोग्य
Sanjay Shirsath : छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढवणार : संजय शिरसाठ

Latest Marathi News जागा वाटपाचे उद्या चित्र स्पष्ट होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार Brought to You By : Bharat Live News Media.