दुर्दैवी ! टेम्पोच्या धडकेत बालिका ठार; बाप-लेक जखमी

दुर्दैवी ! टेम्पोच्या धडकेत बालिका ठार; बाप-लेक जखमी

तळेगाव ढमढेरे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे – नगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरूर) येथे टेम्पोच्या धडकेत बालिका ठार झाली. गीता गणेश शित्रे (वय 11, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे तिचे नाव आहे. तिचे वडील व भाऊ या अपघातात जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी कैलास हिरामण औसरमोल या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे नगर बाजूने भरधाव टेम्पो (एमएच 16 एई 9517) पुणेच्या दिशेने येत होता. पाबळ चौकातील रस्ता दुभाजकावर टेम्पो आदळला. टेम्पोने तिघा पादचार्‍यांना चिरडत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने फरफटत नेले. या अपघातात बालिका टेम्पोच्या चाकाखाली अडकून मृत्यू पावली.
सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, हवालदार शंकर साळुंके, अविनाश पठारे, विकास मोरे, नारायण सानप यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात शित्रे हिचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश सदाशिवराव शित्रे (वय 48), परीक्षित गणेश शित्रे (वय 9, दोघेही रा. शिक्रापूर) हे बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत नागनाथ राजेंद्र गव्हाणे (वय 41, रा. शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कैलास हिरामण औसरमोल (वय 45, रा. यश इन चौक, कारेगाव, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापू हाडगळे तपास करीत आहेत.
हेही वाचा

India-Pakistan Lesbian Couple : मी तिला धोका दिलाय; भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाआधीच ब्रेकअप
नागपूर : राजूरवाडी तांड्यावर कौटुंबिक वाद, व्हायरल व्हिडिओने खळबळ
Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी..!

Latest Marathi News दुर्दैवी ! टेम्पोच्या धडकेत बालिका ठार; बाप-लेक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.