Loksabha election | महाविकास आघाडीसोबत आंबेडकर यावेत : बाळासाहेब थोरात

Loksabha election | महाविकास आघाडीसोबत आंबेडकर यावेत : बाळासाहेब थोरात

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत यावेत, ही आमची इच्छा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. विदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत असल्याने, या बाबतचा निर्णय उद्या (दि. 26) होईल, असे काँग्रेसने नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पुण्यात महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने, निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी थोरात यांनी स्थानिक नेत्यांची बैठक काँग्रेस भवनमध्ये सोमवारी घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, दत्ता बहिरट आदी या वेळी उपस्थित होते. पुण्यातील काँग्रेसमधील वादाबाबत विचारणा केली असता, थोरात म्हणाले, सर्वच पक्षांत कमी-जास्त प्रमाणात वाद असतात. काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याने आमच्यात कार्यकर्ते उघडपणे मत मांडतात. कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना सोबत घेऊन काम करू. थोरात म्हणाले, राज्यात निवडणुकीत बरेच टप्पे असल्याने प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला. विदर्भात सुरुवातीला मतदान असल्याने तेथील उमेदवार लवकर ठरविण्यात आले. अन्यत्र चर्चा सुरू आहे. नगर जिल्ह्यात महाविकास आघाडी विजयी होईल.
हेही वाचा

सावधान ! आक्षेपार्ह पोस्ट पडतील महागात; प्रशासनाचा मोठा निर्णय
असेही भाडेकरु! शासकीय कार्यालयांकडे महापालिकेचे कोटींचे भाडे थकीत..
पैठण : आडुळ येथे समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Loksabha election | महाविकास आघाडीसोबत आंबेडकर यावेत : बाळासाहेब थोरात Brought to You By : Bharat Live News Media.