‘यूपीएससी’ची प्रिलिम्स पुढे ढकलली; जाणून घ्या नवीन तारीख

‘यूपीएससी’ची प्रिलिम्स पुढे ढकलली; जाणून घ्या नवीन तारीख


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी (दि.२०) लोकसभा निवडणुकीमुळे २६ मे रोजी होणारी प्रिलिम्स परीक्षा १६ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर अधिकारी निवडण्यासाठी UPSC दरवर्षी तीन टप्प्यात नागरी सेवा परीक्षा आयोजित करते.
युपीएससीने सांगितले की, ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक पाहता, आयोगाने प्रिलिम्स परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’ परीक्षेच्या काही दिवस आधी उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाइन जारी केले जातील. निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पूर्व परीक्षा १६ जूनला होणार असून मुख्य परीक्षा २० सप्टेंबरपासून पाच दिवस चालणार आहे.

EXAMINATION NOTICE No. 05/2024 CSP
Re-scheduling of CS(P)-IFoS(P) Examination, 2024
Details : https://t.co/fgXX8mm5ot#UPSC@PIB_India https://t.co/Aa2RV2agNz
— Union Public Service Commission (UPSC) (@upsc_official) March 19, 2024

यापूर्वी, आयोगाने नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील वाढवली होती. अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च पर्यंत वाढवण्यात आली होती.
हेही वाचा : 

जगातील आनंदी देशांची ‘क्रमवारी’ जाहीर, भारत कितव्‍या स्‍थानी?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधराशे अग्नीशस्त्रे होणार जमा
हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय, ७,५०० कर्मचाऱ्यांना नारळ, कारण काय?

The post ‘यूपीएससी’ची प्रिलिम्स पुढे ढकलली; जाणून घ्या नवीन तारीख appeared first on Bharat Live News Media.

Go to Source