माळरानावर बटाट्याचे भरघोस उत्पादन

माळरानावर बटाट्याचे भरघोस उत्पादन

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील युवा शेतकरी महेश सोनभाऊ टेमगिरे यांनी माळरानावर प्रतिकूल परिस्थितीत बटाट्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. एका कट्ट्याला तब्बल 17 पिशव्यांचे गळीत त्यांना मिळाले आहे. थोरांदळे गावात पाईन मळ्यात माळरानावर महेश टेमगिरे यांनी बटाटा पीक घेतले आहे. यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे बटाटा पिकाला पाण्याचा ताण बसला. महेश टेमगिरे यांनी बटाटा पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केले. सध्या त्यांच्या शेतात बटाटा काढणी सुरू झाली आहे. त्यांना बटाट्याचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. त्यांनी 2 हजार 600 रुपये क्विंटल दराने बटाटा बियाणे खरेदी करून एक एकर क्षेत्रात लागवड केली होती.
कारफाटा (रांजणी) येथील जय मल्हार अ‍ॅग्रोचे प्रवीण वाघ यांनी बटाटा पिकाची वेळोवेळी पाहणी करून टेमगिरे यांना मार्गदर्शन केले. आता एका कट्ट्याला तब्बल 17 पिशव्यांचे गळीत त्यांना मिळाले आहे. या बटाट्याची व्यापार्‍यांनी खरेदी केली. 10 किलोला 175 रुपये दर त्यांना मिळाला आहे.
बटाट्याचे दर यंदा कमीच
पाऊस, रोगराईचे सावट याचा बटाटा पिकाला फटका बसला आहे. गळितामध्ये प्रचंड घट झाली आहे. या भागातील शेतकर्‍यांना एका कट्ट्याला अवघ्या चार ते पाच पिशव्यांचे गळीत निघाले आहे. असे असताना टेमगिरे यांनी माळरानावर बटाट्याचे भरघोस उत्पादन मिळवले. परंतु यंदा बाजारभाव बटाट्याला कमीच मिळत आहे. त्यामुळे आम्हा बटाटा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजी असल्याचे मत महेश टेमगिरे यांनी व्यक्त केले.
The post माळरानावर बटाट्याचे भरघोस उत्पादन appeared first on पुढारी.

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील युवा शेतकरी महेश सोनभाऊ टेमगिरे यांनी माळरानावर प्रतिकूल परिस्थितीत बटाट्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. एका कट्ट्याला तब्बल 17 पिशव्यांचे गळीत त्यांना मिळाले आहे. थोरांदळे गावात पाईन मळ्यात माळरानावर महेश टेमगिरे यांनी बटाटा पीक घेतले आहे. यंदा पाऊस कमी पडला. त्यामुळे बटाटा पिकाला पाण्याचा ताण बसला. महेश …

The post माळरानावर बटाट्याचे भरघोस उत्पादन appeared first on पुढारी.

Go to Source