सिंधुदुर्गवासियांकडून स्वच्छतेसाठी पर्यटकांना साद, अनोखे स्वागत

सिंधुदुर्गवासियांकडून स्वच्छतेसाठी पर्यटकांना साद, अनोखे स्वागत

फोंडाघाट: पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहेच. त्याशिवाय देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा आहे. सध्या दिवाळीच्या सुट्टी असल्याने राज्यांसह देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सिंधुदुर्गमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या फोंडाघाटात पर्यटकांचे पुष्प देऊन सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने स्वागत करण्यात आले. Sindhudurg
यावेळी पर्यटकांना अशी विनंती करण्यात आली की, आमच्या जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांचा आपण मनसोक्त आनंद घ्या, काही दिवस सिंधुदुर्गमध्ये थांबा, देशभरात स्वच्छ जिल्हा असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या जिल्ह्याची काळजी घ्या, प्रवास करताना गाडीतून प्लास्टिक बाटल्या बाहेर फेकू नका. आपल्याकडील कचरा ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या कचरा कुंडीत टाका. परंतु, कृपा करून बाटल्या व कचरा रस्त्यावर किंवा इतरत्र फेकून देऊ नका, असे सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने पर्यटकांना आवाहन करण्यात आले. Sindhudurg
त्याचबरोबर पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. अतिउत्साहमध्ये अनेक वेळा अनुचित घटना घडल्याचे प्रकार घडले आहेत. वारंवार अशा घटना आताही घडत आहेत, त्यामुळे पर्यटकांनी खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तुमचे पर्यटन सुखी व्हावे, अशा सदिच्छाही देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार गणेश जेठे, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, मोहन पडवळ, महेश सावंत, तुषार नेवरेकर, अनिल मेस्त्री, सचिन राणे, अमित गोसावी, मनोज ठाकूर, सुधीर राणे, गुरुप्रसाद सावंत, सत्यवान साटम, विजय जामदार, संजय नेरूरकर, अभिजित सावंत, विजय तेजम, अमित पाटील, नितीन राणे यांनी पर्यटकांना सूचना व शुभेच्छा दिल्या. पोलीस कॉन्स्टेबल मारुती बारड, व्हीलेज इको डेव्हल्पमेंट कमिटीचे प्रसाद पाटील हे उपस्थित होते.
हेही वाचा 

Sindhudurg :सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी प्रकृती अस्वस्थतेमुळे रुग्णालयात दाखल
रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत भाजपात नाराजी
सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा!

The post सिंधुदुर्गवासियांकडून स्वच्छतेसाठी पर्यटकांना साद, अनोखे स्वागत appeared first on पुढारी.

फोंडाघाट: पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहेच. त्याशिवाय देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा आहे. सध्या दिवाळीच्या सुट्टी असल्याने राज्यांसह देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सिंधुदुर्गमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या फोंडाघाटात पर्यटकांचे पुष्प देऊन सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने स्वागत करण्यात आले. Sindhudurg यावेळी पर्यटकांना अशी विनंती करण्यात आली की, आमच्या जिल्ह्यातील अनेक पर्यटन …

The post सिंधुदुर्गवासियांकडून स्वच्छतेसाठी पर्यटकांना साद, अनोखे स्वागत appeared first on पुढारी.

Go to Source